Ticker

6/recent/ticker-posts

कर्जत जामखेड विधानसभा राष्ट्रीय समाज पक्षाकडून लढवणार कर्जत जामखेड मतदार संघात परिवर्तन अटळ :- विकास मासाळ...

जामखेड :-  राष्ट्रीय समाज पक्षाच्या कर्जत येथील आढावा बैठकीत राष्ट्रीय समाज पक्षातर्फे विकास मासाळ हे निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले . यावेळी बोलताना विकास मासाळ म्हणाले , राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर , उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष शरद बाचकर, राज्य कार्यकारिणी सदस्य भानुदास हाके (मेजर), शहाजीराजे कोरडकर ,दक्षिण अ.नगर जिल्हाध्यक्ष , आत्माराम कुंडकर नगर दक्षिण लोकसभा अध्यक्ष ,रमेश व्हरकटे कर्जत जामखेड विधानसभा पक्ष निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहे. 
         गेली कित्येक वर्ष कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघ दुर्लक्षित राहिला असून या विधानसभा मतदार संघावर सर्वच पक्षाचे आमदार झाले . परंतु मतदार संघाचा विकास झाला नाही. तालुक्यातील दळणवळणासाठी रस्ते , तरुणांना रोजगारासाठीसाठी एमआयडीसी, कुकडी सीना नियमित आवर्तन , आरोग्य सुविधा , व इतर अनेक प्रश्नांवर सत्ताधारी आमदारांनी डोळेझाक केली. येणाऱ्या काळात राष्ट्रीय समाज पक्ष हाच कर्जत जामखेड साठी खरा पर्याय ठरणार असून सर्वसामान्य लोकांचा पक्ष अशी राष्ट्रीय समाज पक्षाची ख्याती आहे.सत्ताधारी आमदारांनी फक्त एकमेकांवर राजकीय चिखलफेक कर्जत स्वतःची पोळी भाजून घेतली मात्र ज्या लोकांनी निवडून दिले त्यांचे प्रश्न त्यांनी सोडवले नाहीत . 
         कर्जत जामखेड मतदारसंघ हा मोठा दुर्लक्षित मतदारसंघ असून शिक्षण, रस्ते ,व्यापार, एमआयडीसी , कुकडी , सिना आवर्तन, तुकाई चारी प्रलंबित प्रश्न , शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी मोठी बाजारपेठ , कर्जत एस .टी.डेपो , विजेचा प्रश्न असे अनेक प्रश्न गेली कित्येक दिवस आ वासून उभा आहेत.मात्र गेल्या कित्येक वर्षांच्या लोकप्रतीनिधींकडून आश्वासनशिवाय काहीही मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे येणाऱ्या काळात परिवर्तन निश्चित असून राष्ट्रीय समाज पक्षातर्फे ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या