राजेश येसेकर भद्रावती
भद्रावती : बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचार व कलकत्ता येथील हॉस्पिटल मधील डॉक्टर मुलीवर अत्याचाराच्या घटनेने देश ढवळून निघाला असल्याची घटना ताजी असतानाच भद्रावतीत असेच रोडरोमीओ शाळेत येणाऱ्या - जाणाऱ्या मुलिंची रस्त्यावर छडखानी करून त्रास देत असतात. असलाच प्रकार शाळेत निघालेल्या एका अल्पवयीन मुलीचा मोटरसायकल ने पाठलाग करत विनयभंग केल्याची घटना भद्रावती शहरातील गुंडावार लाॅन परिसरात बुधवार दि. २१ ऑगस्टला सकाळी घडली. मुलीच्या तक्रारीवरुन पोलीसांनी २२ ऑगस्टला तिन्ही युवकांना अटक केली. यात आरोपी सुरज शंकर जांबुळे,(२३), विकास गजानन ढोक (२१), आदर्श घातले(२२) हे तिघेही रा. भद्रावती असे आरोपीची नावे आहेत.
घटनेच्या वेळी १७ वर्षिय मुलगी नेहमी प्रमाणे सकाळी शाळेत जात असताना या दरम्यान मुरलीधर गुंडावार लाॅन परिसरात सुरज जांबुळे, विकास ढोक व आदर्श घाडसे हे तिघेही दुचाकीने येवून मुलीला आडवे झाले. यापैकी सुरजने "तु माझ्याशी का बोलत नाही" असे विचारताच सुरजने म बळजबरीने मुलीचा हात पकडला.
त्यामुळे भयभीत झालेल्या मुलीने कशीबशी सूटका केली व धावत सुटली मात्र तिघांनीही पुन्हा या मुलीचा पाठलाग करून अडविण्याचा प्रयत्न केला. मुलीने घरी गेल्या नंतर घडलेला सर्व प्रकार आई- वडिलांना सांगितला त्यानंतर गुरुवारी भद्रावती पोलीसांत तक्रार करण्यात आली. तक्रारीवरुन पोलीसांनी आरोपी सुरज जांबुळे, विकास ढोक व आदर्श घाडसे यांच्याविरुद्ध भारतीय न्यास संहिता कलम ७४ व ७८ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. ठाणेदार बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियंका गेडाम करीत आहे.


0 टिप्पण्या