Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत कर्मचारी युनियन कार्यकारणी गठीत




सचिन चौरसिया जिल्हा प्रतिनिधी नागपूर
चित्रा न्यूज 

रामटेक:- महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एन,जी,पी ४५११ ची रामटेक तालुका कार्यकारणी ग्रामपंचायत काचुरवाही येथे गठीत झाली. ही सभा महाराष्ट्र राज्याचे ग्रामपंचायत युनियन कर्मचारी संघटनेचे राज्यसचिव अशोक कुथे,जिल्हाध्यक्ष दत्ता भोयर व जिल्हासचिव सतीश वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यात विविध विषयांवर चर्चा करून संघटनात्मक दृष्टीकोनातून संघटन चळवळ मजबूत करण्याबाबत विचारमंथन करण्यात आले. याच हेतूने रामटेक तालुका ग्रामपंचायत कर्मचारी युनियन कार्यकारणी गठीत करण्यात आली. त्यात विशाल हुळ अध्यक्ष, शाहू गुरनुले उपाध्यक्ष, शिल्पा ठाकरे सचिव, प्रल्हाद साकोरे कार्याध्यक्ष, उमाशंकर बघेले सहसचिव, नंदू चौहान कोषाध्यक्ष, सुखदेव बंधाटे संघटक, शरबत मोहारे, दिलीप डोनारकर,अनिकेत नागमोते, श्याम उपराडे, सिद्धार्थ सहारे,धनंजय फटींग,अतुल दमाहे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या