प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांचे प्रयत्न सार्थकी
• सभागृह, सौंदरीकरण, अभ्यासिका केंद्र कामाचा समावेश
कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांचे प्रयत्नाने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये लेखाशीर्ष २५१५, १२३८ अंतर्गत साकोली तालुक्यातील १६ गावांत १ कोटी २८ लक्ष रुपयाची सभागृह बांधकाम, सौंदरीकरण, अभ्यासिका केंद्र, रस्ता मजबुतीकरण इत्यादी विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यात किन्ही/एकोडी येथे बौद्ध विहाराजवळ सभागृह बांधकाम १५ लाख, परसोडी येथे गोवारी समाजाच्या जागेजवळ सभागृह बांधकाम १० लाख, अशोक नगर चांदोरी येथे हनुमान मंदीराजवळ सभागृह बांधकाम ७ लाख, खांबा येथे बिरासा मुंडा पुतळ्याजवळ सभागृह बांधकाम ७ लाख, वडेगाव येथे हनुमान मंदिराजवळ सौंदर्यकरण करणे ७ लाख, पळसपाणी येथे अभ्यासिका केंद्राच्या इमारतीचे बांधकाम ७ लाख, गोंडउमरी येथे परमात्मा एक सेवक मंडळाच्या जागेजवळ सभागृह १० लाख, निप्परटोला येथे बिरसा मुंडा पुतळ्याजवळ सभागृह बांधकाम ५ लाख, झाडगाव येथे बिरसा मुंडा पुतळ्याजवळ सभागृह बांधकाम ७ लाख, पापडा/खुर्द येथे बिरसा मुंडा पुतळ्याजवळ सभागृह बांधकाम ७ लाख, सालेबर्डी येघे ढीवर समाजाच्या जागेजवळ सभागृह बांधकाम ७ लाख, कुंभली येथे विठ्ठल रुखमाई मंदिराजवळ सभागृह बांधकाम ७ लाख, सावरबंध येथे शिवमंदिराजवळ सभागृह बांधकाम ७ लाख, जांभळी/सडक येथे पोद्दार शाळेला जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण १० लाख, जमनापूर येथे बौद्ध विहाराजवळ सभागृह बांधकाम १० लाख, बोदरा येथे बौद्ध विहाराजवळ सौंदर्यकरण ५ लाख इत्यादी विकास कामांचा समावेश आहे.


0 टिप्पण्या