सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098
जामखेड :- स्वातंत्र्यदिनीअखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रवचनात ईस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन चरित्रावर चुकीचे व आक्षेपार्ह वक्तव्य करुन मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने दुपारी खर्डा चौक येथुन तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. तीन तासाच्या आंदोलनानंतर रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
मंगळवारी दुपारच्या नमाज पठणनंतर शहरातील मुस्लिम समाज बांधव खर्डा चौकात दुपारी 2 वाजता मोठ्या संख्येने जमले होते. ईस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन चरित्रावर चुकीचे व आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ खर्डा चौक येथून मुस्लिम समाजाच्या मोर्चाला प्रारंभ झााला. युवकांनी घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर आला. संतप्त युवकांनी जोरदार घोषणाबाजी करुन सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, बहुजन वंचित आघाडीचे प्रवक्ते डॉ. अरूण जाधव, भिमसैनिक विकी सदाफुले, संभाजी बिग्रेडचे कुंडल राळेभात, प्राचार्य विकी घायतडक, शिवसेना तालुकाध्यक्ष प्रा. कैलास माने व इतर राजकीय पक्ष ; संघटना सामील झाले होते .सर्व मुस्लीम समाजातील धर्मगुरू मुफ्ती अफजल कासमी, मुफ्ती मौलाना खलील अहमद व मुस्लीम समाज बहुसंख्येने उपस्थित होते.रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज रा. सरला बेट, ता. बैजापूर छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) यांनी मौजे पंचाळे तालुका सिन्नर जि. नाशिक येथे स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट रोजी अखंड हरिनाम सप्ताहाच्या जाहीर प्रवचनात सर्व लोकांसमक्ष व लाईव्ह प्रक्षेपण सुरू असताना ईस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन चरित्रावर चूकीचे व आक्षेपार्ह वक्तव्य करुन मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने समस्त मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेले आहेत.
राज्यातील मुस्लिम समाज बांधव सर्व धर्माचा आदर व सन्मान करत आला आहे व
करत आहे. मात्र काही महाराज ब राजकीय नेते मंडळी वारंवार ईस्लाम धर्माबाबत चुकीची माहिती देऊन इतर समाजात मुस्लिम द्वेष कसा वाढेल यासाठी प्रवचन व भाषणामध्ये मुस्लिम समाजाला टार्गेट करून व चुकीचा संदेश देऊन समाजात द्वेष पसरवित आहे. पोलीस प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने ते वारंवार भडकाऊ भाषण देऊन ते जातीय तणाव निर्माण करण्याचे काम करत आहे. यामुळे नागरिक रस्त्यावर उतरु लागले असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असून, याला प्रशासन जबाबदार आहे.रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा संपूर्ण मुस्लिम समाज निषेध करत आहे. धार्मिक प्रवचनात इतर धर्मांचा अपप्रचार करणे हे अयोग्य व भावना दुखावणारे आहे. स्वातंत्र्य दिनी प्रवचनातून सदर महाराजांनी संविधान आणि लोकशाहीवर आघात करणारे कृत्य केले आहे. महिलांवर होणारे अत्याचार हे सर्वच समाजातील गंभीर प्रश्न असून, या अत्याचाराला एखाद्या धर्माचा रंग देणे, अयोग्य आहे. महिलांवरील अत्याचार करणारे
आरोपी हे विविध जाती- धर्मातील असून, त्यांना एकाच जातीचा लेबल लावण्याचे काम या महाराजांनी केला आहे. रामगिरी महाराज आपल्या प्रवचनातून नागरिकांच्या भावना भडकाविण्याचे व समाजात द्वेष पसरवण्याचे काम करत आहे. हा प्रकार निंदनीय व लोकशाहीला काळिमा फासणारा असल्याचे म्हंटले आहे. असे यावेळी आंदोलकांनी म्हटले. तहसीलदार गणेश माळी व पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे आंदोलनस्थळी येऊन मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्विकारले. आंदोलकांनी यावेळी रामगिरी महाराजावर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी डी वाय एस पी वाखारे यांच्याकडे केली. तीन तासांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. सोहेल अझरुद्दीन काझी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्यायसंहीता २०२३ चे कलम १९२,१९६,२९९,३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.या मोर्चाला पोलीस उपाधिक्षक विवेकानंद वाखारे व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता . हा मोर्चा शांततेत पार पडला .


0 टिप्पण्या