विठ्ठल पाटील लातूर
लातूर :-हंडरगुळी येथील नामांकित असलेल्या शिवाजी उच्च व उच्च मा.शाळेतील शाळकरी मुलांची वडगाव एक्की (ता.चाकुर) या मार्गावर होणारी विद्यार्थ्यांची अवैध जीवघेणी वाहतूक हा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे व याबाबत पेपरबाजी करुनही RTO आरटीओ कारवाही न करताच हाळी मार्गे ये-जा करीत असल्याचे दिसते.व आरटीओ व्हॅन दिसताच पळा..पळा आरटीची गाडी आली.पळा रे पळा अशा प्रकारचा गळा वाहनधारक काढतात.व फोनवरुन माहिती देतात व घेतात.दिवसातुन दोनदा आरटीओ व्हॅन या मार्गावरुन ये-जा करते.माञ सामान्य जनतेला दिसणारे वडगाव रोडवरील विद्यार्थ्यांची अवैधरित्या वाहतूक करणारे वाहन आरटीओ च्या गाडीतील लोकांच्या नजरेस का पडत नाही ? का,त्यांना या वाहनाचा अपघात होऊन विद्यार्थ्यांचे बरेवाईट झाल्यावरच आरटीओला वडगाव रोडवरील विनापरमीट सुरु असलेली विद्यार्थी वाहतूकीचा पीकअप मॅजिक वाहन दिसेल का ? तसेच येथे शेकडो गाड्या अशा आहेत की ज्यांच्याकडे कोणते ही कागदपञ व नंबर नसलेले व मुदत संपलेली असे शेकडो वाहने धावताना जनतेला दिसतात.माञ उदगीरच्या आरटीओ महाशयाला का व कुणामुळे दिसत नाहीत?यासारखे प्रश्न आरटीओ महाशयास विचारावेसे वाटतात.
उदगीर शहरानंतर तालुक्यात सर्वात मोठे व राज्यरोडलगत असलेल्या हाळी-हंडरगुळी या जोडगावात गत कांही महिण्यापासुन वाहतूकीचा प्रश्न गंभीर बनल्याचे दिसते.त्यात 12 ते 16 वयाची पोरं दुचाकीसह अन्य गाड्या सुसाट पळवतात.तसेच नंबर प्लेट नसलेली/मुदत संपलेली शेकडो वाहने कुठेही कशाही त-हेने उभा केल्याचे दिसते.यामुळे वाहतूकीला अडथळा होतो.व याचा सर्वाधिक ञास हा व्यापारी व पायी ये-जा करत असलेल्यांना होतो.बेशिस्तीत पार्किंग केलेल्या गाड्यांमुळे दिवसातुन 2 / 4 वेळेस राज्यमार्गावर वाहतूक कोंडी होण्याचा प्रकार हा नित्याचाच झाला आहे.कारण एकीकडे राज्यमार्गावर हातगाडे व त्यांचेकडील कॅरेट्स आदी साहित्य रोडटच असते.तर दुसरीकडे बेशिस्तीत पार्क केलेली वाहने.यांची चलती असल्याचे दिसुन येते.कारण आजवर याकडे कारवाही करणारे कुणीच तयार झाले नाहीत.किंबहूना कारवाई करण्याऐवजी डोळेझाक करा,असा आदेशच वरिष्ठांनी कनिष्ठ मंडळींना दिला की काय.अशी शंका येते.कारण वरील सगळा प्रकार अन् अवैध विद्यार्थी वाहतूक दिनदहाडे होत आहे.तरीही याकडे आजवर कुणीच लक्ष दिले नाही.तसेच उदगीर येथे आरटीओ कार्यालय सुरु झाले आहे.आणी व्हॅन अधून-मधून हाळी मार्गे ये-जा करताना दिसते.माञ याच व्हॅन मधील लोकांना अवैध वाहतूक करणारी व अन्य वाहने दिसत नाहीत याचे नवल वाटते.व अशा वाहनांवर एकदा ही कारवाही केली नाही.या - मुळे उदगीरचे आरटीओ कार्यालय म्हणजे असुन अडचण,नसुन खोळंबा असे म्हटले जाते.एकंदरीत सुसाटपणे धावणा-या आरटीओची व्हॅन येताच पळा..पळा..आरटीओ आला..! असा मेसेज फोनवरुन वाहनधारक देतात..


0 टिप्पण्या