अल्कोहोलिक्स अँनानिमस जागतिक संघटनेचे योगदान
दखल गावाची आणि गावकऱ्यांची
रवी भोंगाने साकोली
साकोली:-योगायोगाने छोटेसे कुटुंब सुखी कुटुंब असे म्हटले जाते. तसेच छोटेसे गाव सुखसोइने महान असेही म्हटले जात. त्यामूळे गाव करी ते राव या माध्यमातून गावांचा विकास सुद्धा दिसून येतो. अशा तरुणांच्या हातात नेतृत्व सोपीविले की मग काय होते याचे प्रत्यंतर ग्रीन गोल्ड असलेल्या चारगाव या लहानशा गावाने संपूर्ण जिल्हाभर यापूर्वीच दाखवून दिलेले आहे. या गावातील सरपंच मोहन लंजे, उपसरपंच लता भीवगडे, ग्राम विकास अधिकारी किशोर झोडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भिवगडे , चारगाव पोलीस पाटील वीरेंद्र सुतार, सुंदरी पोलीस पाटील पुरुषोत्तम भोयर संपूर्ण ग्रामपंचायत चमू, शिक्षक वृंद आणि गावकरी यांनी ही कमाल करून दाखवलेली आहे. सध्या या गावाने व्यसनमुक्तीचा विडा उचललेला आहे. या गावाने तशी वाटचाल देखील केली आहे. त्यामुळे या गावाने पुन्हा एकदा उपक्रमात सहभाग घेतला आहे. आपल्या गावातील तरुणाई व्यसनांपासून कशी दूर राहील हा संकल्प ग्रामपंचायत तर्फे करण्यात आला आहे. परिणामी या गावाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला. गाव व्यसनमुक्त करण्याचा संकल्प हाती घेतल्याने प्रशासनाने देखील या गावाकडे लक्ष टाकलेले आहे. सध्या जागतिक संघटना अल्कोहोलिक्स अँनानिमस (युनिट--साकोली, सौंदड, बाम्हनी/खडकी आत्मसमर्पण आंतरसमूह-- भंडारा गोंदिया गडचिरोली ) यांच्या माध्यमातून दर शुक्रवारी या गावात व्यसनमुक्तीची बैठक घेऊन व्यसनाचे परिणाम समजावून सांगण्यात येत असते. साकोली वरून अवघ्या ७ कि.मि. अंतरावर असलेले गाव. ग्रीन गोल्डचा संपूर्ण वर्षाव असणारे हे लहानसे गाव. विर्सी फाटा आणि परसोडी (सौंदड) या दोन मार्गावरून चारगावला जाणारा मार्ग आहे. वन सौंदर्याने मुक्तपणे उधळण करून निसर्गाने या गावाला आगळे वेगळे ग्रीन वैभव प्राप्त करून दिले. एक नव्हे दोन नव्हे तर सतत तीन पुरस्काराची सलगपणे हॅट्रिक करून गावकऱ्यांनी तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील नागरिकांना व प्रशासकीय यंत्रणेला अचंबित करून सोडले होते. आर.आर. पाटील व स्वच्छ ग्राम स्पर्धेत चारगावने ५० लक्ष रुपयाचा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त केला होता. त्यामुळे यापूर्वीच्या २ पुरस्कारा मिळून गावाची ९० लक्ष रुपयाची कमाई झाली. केवळ एका वर्षात सलग तीन पुरस्कार प्राप्त करून देणारे जिल्ह्यातील एकमेव गाव. १,७०० लोकवस्तीचे गाव. या गावाने आता नवीन संकल्प घेऊन व्यसनमुक्ती कडे वाटचाल केलेली आहे.


0 टिप्पण्या