🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२४ - २४ ऑगस्ट
शालिवाहन शक १९४६, विक्रम संवत २०८०
भा. रा. ३ भाद्रपद १९४६
युगाब्द ५१२६
संवत्सर नाम : क्रोधी
अयन : दक्षिणायण
ऋतू : वर्षा
मास: श्रावण
पक्ष: कृष्ण
तिथी: पंचमी (०७.५०) ~ षष्ठी (२९.३०)
वार: शनिवार
नक्षत्र: अश्विनी (१८.०५) ~ भरणी
राशी: मेष
*अश्वत्थ मारुती पूजन*
*चंद्र षष्ठी*
*अक्षय षष्ठी*
*श्री वासुदेवानंद सरस्वती तथा टेंबे स्वामी जयंती* (तिथीनुसार)
*हुतात्मा शिवराम राजगुरू जयंती*
*आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन*
१९९८: एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली.
१९९५: मायक्रोसॉफ्टने विंडोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.
१९९१:युक्रेनने स्वत:ला (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र घोषित केले
१९६६:रशियन बनावटीचे लूना-११ हे मानवविरहित यान चांद्रमोहिमेवर निघाले
१९६६: विक्रमवीर भारतीय जलतरणपटू मिहिर सेन यांनी जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली.
१९५५: राममनोहर लोहिया यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली.
१९५०: एडिथ सॅम्पसन हा संयुक्त राष्ट्रात जाणारा पहिला कृष्णवर्णीय अमेरिकन प्रतिनिधी ठरला.
१९३६: ऑस्ट्रेलियन अंटार्क्टिक प्रदेश तयार करण्यात आला.
१८९१:थॉमस अल्वा यांनी चलचित्र कॅमेर्याचे पेटंट घेतले.
१८७५: कॅप्टन मॅथ्यू व्हेब इंग्लिश खाडी पोहणारे पहिली व्यक्ती ठरले.
१६०८:ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत येथे दाखल झाला.
७९: इटलीतील माउंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक. पॉम्पेई, हर्क्युलेनियम स्टेबी ही शहरे राखेखाली दडपली जाऊन नष्ट.
जन्मदिवस :
१८७२:साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा ’तात्यासाहेब’ केळकर – लोकमान्य टिळक तुरुंगात असल्यामुळे त्यांनी १८९७ पासून ‘केसरी‘ व ‘मराठा‘चे संपादन केले. कायदेमंडळाचे सभासद
१८८०:बहिणाबाई चौधरी – कवयित्री. त्या निरक्षर होत्या. तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. शेतीकाम आणि घरकाम करता करता त्या उत्स्फुर्तपणे ओव्या रचून गात असत.
१८८८:बाळ गंगाधर तथा ’बाळासाहेब’ खेर – स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त
१९०८:शिवराम हरी 'राजगुरू' – क्रांतिकारक
१९१८: पूर्व केन्द्रीय परराष्ट्रमंत्री सिकंदर बख्त
१९२०:पं. बसवराज राजगुरू – किराणा घराण्याचे गायक.
१९३२: रावसाहेब गणपराव जाधव – मराठीतील व्यासंगी साहित्यसमीक्षक. ‘महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा’चे तिसरे अध्यक्ष व ‘मराठी विश्वकोशा’चे प्रमुख संपादक (२००१ – २००३).
१९४४: संयुक्ता पाणिग्रही – ओडीसी नर्तिका
१९४५: डब्ल्यू.डब्ल्यू.ई. (WWE) चे सहसंस्थापक विन्स मॅकमेहन
मृत्यूदिन :
२०१९: भारताचे केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली
२०००:कल्याणजी वीरजी शाह – सुमारे तीन दशके रसिकांवर आपल्या सुरावटीची मोहिनी घालणार्या ’कल्याणजी-आनंदजी’ या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ
१९९३:शतायुषी क्रिकेटमहर्षी प्रा. दिनकर बळवंत तथा दि. ब. देवधर – प्रथमश्रेणीचे ६२ सामने, १०० डाव, ११ वेळा नाबाद, ९ शतके, ३९५१ एकूण धावा, ४४.३९ सरासरी. भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री (१९६५) व पद्मविभूषण (१९९१) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
१९२५:सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर – संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक
*।। दास-वाणी ।।*
अवघा वेलचि कर्पतो ।
मुळापासून पुन्हा होतो ।
ऐसा अवघा विचार जो तो ।
प्रत्यक्ष जाणावा ।।
मूळ खाणोन काढिलें ।
प्रत्ययेज्ञाने निर्मूळ केले ।
तरी मग वाढणेंचि राहिलें ।
सकळ कांहीं ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : १५/०७/१५-१६
पानगळ होते. पुन्हा पानफुटी होते. फुले येतात फळे लगडतात. कालांतराने ती गळून पडतात.
पुन्हा पुन्हा बहर येतो आणि जातो.
कधी कधी अख्खा वेलच करपून ? जातो. परंतु मुळापासून तो परत उगवतो, वाढतो, फळतो फुलतोही. हे उत्पत्ती स्थिती लयाचे चक्र निरंतर
सुरूच राहाते.
वेलीचे मूळ खणून काढले, संपूर्ण उपटून काढून फेकून दिले तर मात्र ती वेल किंवा वृक्ष परत कधीच उगवत नाही. हे वेलीचे रूपक आहे. साधकाने कठोर साधनेअंती अनुभूती घेऊन
मूळमायेचा कायमस्वरूपी निरास केला तर तो ब्रह्मस्वरूप होऊन जातो. जन्म मरणाचे हे दुष्टचक्र कायमचे संपते. हा सिद्धांत आहे.
*अधोर्धनिरूपण समास.*
*माहिती विशेष*
*नरसिंह चिंतामण केळकर* - ऊर्फ तात्यासाहेब केळकर (२४ ऑगस्ट १८७२ - १४ ऑक्टोबर १९४७) हे मराठी पत्रकार, नाटककार, राजकारणी होते. केसरी वृत्तपत्राचे ते संपादक होते. त्यांच्या प्रकाशित लेखनाची पृष्ठसंख्या १५ हजारांच्या आसपास असून त्यात लोकमान्यांचे चरित्र (२ खंड), मराठे आणि इंग्रज, भारतीय तत्त्वज्ञान, ‘तोतयाचे बंड’ (नाटक) ‘कोकणचा पोर’, ‘बलिदान’ यांसह ८ कादंबर्या, आदींचा समावेश आहे.
*संकलक : सुधीर देशपांडे (आबा)*
🙏 💐💐💐💐 💐 🙏


0 टिप्पण्या