रावजी फटे विद्यालय खराशी चा उपक्रम
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा- भारतीय सणामध्ये रक्षाबंधन सणाला अनन्य साधारण महत्व आहे. सीमेवरील भारतीय सैनिक अहोरात्र देशाची व देशातील नागरिकांचे रक्षण करतात तथा कुटुंबापासून हजारो किलोमीटर दूर राहतात . ऊन, वारा, थंडी, पाऊस याची तमा न बाळगता , स्वतःच्या जीवाची पर्वा न करता भारतमातेचे रक्षण करतात. राष्ट्रपती, पंतप्रधान यासारख्या महत्वाच्या व्यक्ती व इस्रो सारख्या संस्था देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी अथक प्रयत्न करतात . याची जाणीव ठेऊन रावजी फटे विदयालय व कनिष्ठ कला महाविद्यालय खराशी, तालुका लाखनी येथील विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित अतिशय सुंदर राख्या तयार केल्या व भारताचे राष्ट्रपती , पंतप्रधान ,भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्त्रो ), सीमेवारील जवानांना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,जिल्हा परिषद भंडारा चे माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी पं. स. लाखनी यांना वर्ग 5 ते 12 च्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राखीसह शुभेच्छा पत्र मुख्याध्यापक यांच्या मार्फत पाठविल्या. याप्रसंगी मुख्याध्यापक एस. वाय. शिवणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपक्रमाचे यशस्वी होण्यासाठी सनोद गौतम रंगारी, एल. बी. कातोरे, एम. व्ही.वालुलकर, डी. बी. नागरिकर, सी. डी. झलके, एस. एल. मेश्राम , शुभांगी चेटूले, प्रियंका अवचटे, प्रियंका शिवणकर, संध्या हटवार व शिक्षकेत्तर कर्मचारी विनू चेटूले, थालीराम चेटूले, बबिता गोस्वामी यांनी सहकार्य केले.


0 टिप्पण्या