Ticker

6/recent/ticker-posts

आम आदमी पार्टी भद्रावती चा प्रयत्नाला अजून एक यश.

शहरात मच्छर किट नाषक फवारणी सुरू.

राजेश येसेकर भद्रावती

भद्रावती : दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी आम आदमी पार्टी भद्रावतीच्या वतीने शहरात मच्छर किट नाषक फवारणी सुरू करण्या बाबत नगर परिषद भद्रावती येथे निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची दखल नगर परिषद भद्रावती द्वारा घेन्यात आले असून शहरात मच्छर किट नाषक फवारणी सुरू करण्यात आले आहे. सतत भद्रावती शहरात डेंग्यूच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते व शहरात प्रत्येक दुसऱ्या घरी डेंग्यू, मलेरिया, टायफॉइडचा रुग्ण आढळत आहे. परंतु नगर परिषद भद्रावतीद्वारे मच्छर किट नाषक फवारणी सुरू करण्यात आली नाही. हे सगळे विषय लक्षात घेत आम आदमी पार्टी भद्रावतीच्या वतीने या संबंधित नगर परिषद भद्रावती येथे मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले व निवेदना द्वारे मागणी करण्यात आले की, 1. प्रत्येक वार्डांत हफ्त्यातून दोन वेळा मच्छर किट नाषक फवारणी करा. 2. शहरात डेंग्यू, टायफॉइड, मलेरिया सारख्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी प्रचार प्रसार च्या माध्यमातून जनजागृती आणावी. 3. सरकारी नळ द्वारे घरो घरी पाणीपुरवठा होत असून ते पाणी पिण्या योग्य आहे. का यावर लक्ष केंद्रित करावे. या सगळ्या मागण्या विषयी आज नगर परिषद भद्रावती द्वारा मच्छर किट नाषक फवारणी शहरात सुरू करण्यात आले असून आम आदमी पार्टीने नगर परिषद भद्रावतीचे आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या