Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांगांसोबत रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन


सचिन चौरसिया जिल्हा प्रतिनिधी नागपूर
चित्रा न्युज

 रामटेक;- मातृका फाउंडेशन व सक्षम रामटेक यांच्यातर्फे स्नेह सदन शाळेमध्ये दिव्यांग मुलांसोबत दि.२० ऑगस्ट २०२४ ला साजरा करण्यात आला.
रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण भावाच्या नात्याला जोडून ठेवणारा हा सण आहे...
तुझ्यावर कोणतीही परिस्थिती आली तरी मी सदैव, तुझ्या सोबत आहे.
हा आत्मविश्वास भाऊ बहीणीला देत असतो....हेच रेशीम बंधनाचे नाते आम्ही दिव्यांग मुलांन सोबत राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला..यात सर्व मातृकाच्या महीलांनी सहभाग दर्शविला....
मातृका फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ डॉ. अंशुजा किंम्मतकर मॅडम, लक्ष्मी माथरे, डॉ मंजुषा सेलोकर , शोभा अडामे, मेघा वंजारी, टेंभुर्णीकर मॅडम, कोमल  कुलरकर, शितल उके, प्रिया कुरे यांनी सर्व , सर्व मुलांना फळ आणि खाऊ वाटून व त्यांना राखी बांधून सर्व दिव्यांग मुलांसोबत अतिशय आनंदात रक्षाबंधनाचा सण साजरा केला. तसेच या दिव्यांग मुलांची दिवस-रात्र सेवा करणारे या शाळेचे सर्व कर्मचारी वृंद यांनासुद्धा  सर्व मातृकाच्या महिलांनी  राखी बांधली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य या शाळेचे मुख्याधिकारी पांडे सर व त्यांचे सर्व सहयोगी कर्मचारी वृंद.  तसेच मातृका फाउंडेशनच्या सर्व सदस्य  व सक्षम चे सदस्य व रुपेश कुरे  यांनी सुद्धा विशेष सहकार्य केले.  दिव्यांगांसोबतचा रक्षाबंधन चा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या