Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा कारागृहातील बंदिवान कैद्यांना मार्गदर्शन



 केंद्रीय मानवाधिकार संघटनेचा पुढाकार 

कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली यांच्या वतीने भंडारा जिल्हा कारागृह वर्ग-१ येथे बंदिवान कैद्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन व संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कारागृह अधीक्षक आदरणीय डी. एस. आडे, तुरुंग अधिकारी पी. आर. चोपकर, तुरुंग अधिकारी संतोष क्षीरसागर, केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवानंद नंदागवळी यांची प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेसमोर दिप प्रज्वलीत करुन भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिकरित्या वाचन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 
                      केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. देवानंद नंदागवळी यांनी उपस्थित सर्व कैद्यांना संस्थेच्या कार्याविषयी व मानव अधिकार अधिनियम १९९३ कायद्याची सविस्तर माहिती देऊन बंदिवान कैद्यांना मोफत कायदेशीर सुविधा उपलब्ध करून देणे आणि इतर कल्याणकारी उपक्रमांसाठी न थांबता कार्य करीत असल्याचे प्रास्ताविकात मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. प्रख्यात कलावंत प्रा. प्रियदर्शन सोनटक्के(टोनी) नागपूर यांनी देशभक्तीपर गितांवर आकर्षक नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली. तर सुप्रसिद्ध गायक सुशीलकुमार खांडेकर भंडारा यांनी आपले सुमधुर गायन सादर करून तुरुंगातील कैद्यांमध्ये आनंदयय व उत्साहाचे वातावरण निर्माण केले. बंदिवान कैद्यांच्या टाळ्यांच्या गजरात कार्यक्रम शांततेत पार पडला. कार्यक्रमाप्रसंगी कारागृहातील कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांनी कायद्याचे पालन करीत शांतता व सुव्यवस्था सांभाळली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालूकाध्यक्ष अश्विनी भिवगडे तर आभार जिल्हा संयोजक  जयेंद्र देशपांडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता महेंद्र तिरपुडे, सोपान रंगारी, राज्य महिला प्रवक्त्या डॉ. रोशनी मेहेरे यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या