Ticker

6/recent/ticker-posts

मागासवर्ग आयोगाचे सदस्य मा.कैलास गौड साहेबांनी ग्रामीण विकास केंद्र संस्थेला भेट दिली..

सुजित धनवे चित्रा न्युज
जामखेड :- आज दि. 2 ऑग 2024 रोजी *मा.श्री कैलास भरत गौड* (महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग सदस्य) यांनी ग्रामीण विकास केंद्र जामखेड संस्थेला भेट दिली यावेळी ग्रामीण विकास केंद्राच्या सर्व कार्यकर्त्यांनी संस्थेच्या वतीने मा.श्री.कैलास भरत गौड यांचा सन्मान केला व आपली ओळख करून आपण कोणत्या समूहासोबत काम करतो सांगितले त्यावेळेस मा.श्री कैलास भरत गौड साहेब यांनी स्वतःची ओळख सांगितली व म्हणाले सन-1983 पासून मी भटके विमुक्तांच्या चळवळीत काम करत आहे.भटके विमुक्तांचे प्रश्न त्यांची भाषा राहणीमान आहार शासनाच्या विविध योजना नागरिकत्वाचे पुरावे बालविवाह शिक्षण या सर्व अडचणी वरती आयुष्यातील खूप दिवस संघर्षात घातले.. मी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग सदस्य असल्यामुळे मला भटके विमुक्त यांच्या बद्दल खूप अभ्यास आहे.असे कैलास भरत गौड साहेब म्हणाले.. 
             25 एप्रिल सन-1987 साली हायकोर्टावरती मोर्चा काढला होता मूळ भटके विमुक्तांना शेड्युल कास्ट व शेडूल स्ट्राईक (अनुसूचित जाती जमाती) मध्ये सामील करण्यासाठी याचिका दाखल केली घटनात्मक संरक्षण व सवलती मिळण्याबाबत ..
      तसेच सन-1949 साली आंत्रोळीकर आयोग लागू झाला भटके विमुक्तांचा अभ्यास करून भटके विमुक्तांसाठी काय करता येईल का व  आंत्रोळीकर आयोगाचे सदस्य *टकारी समाजाचे* मा.भिमराव जाधव होते. सन 1959 साली वन मॅन थाडे कमिशन आयोग लागू झाला भटके विमुक्तांचा अभ्यास करण्यासाठी मुंबई राज्य थाडे कमिशन भारतामध्ये गुजरात,महाराष्ट्र,कर्नाटक भाषा वार प्रांत रचना आली व 1 मे 1960 साली महाराष्ट्र,गुजरात,कर्नाटक निर्माण झाले तसेच रेणके आयोग,भिकू विधाते आयोग,अग्रवाल आयोग याबद्दल मार्गदर्शन केले.
         यावेळी *मा.श्री.ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव* (ग्रामीण विकास केंद्र संस्थापक अध्यक्ष) म्हणाले माझ्या आयुष्यातील चळवळीची सुरुवात मा. श्री.कैलास भरत गौड साहेब यांच्या पासून झाली मी त्यांनी दिलेली शिकवण कधीही विसरलो नाही आजही सर्व आयुष्यातील दिवस भटके विमुक्तांच्या आदिवासींच्या गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी दिले आहे असे आबा म्हणाले...
        यावेळेस मा.बापू ओहोळ (संचालक ग्रामीण विकास केंद्र जामखेड) मा.मनोज प्रताप गौड (इन्स्पेक्टर महानगरपालिका मुंबई) त्रिलोक भगत कचवाय,सचिन भिंगारदिवे,राजू शिंदे, आजिनाथ शिंदे,आतिश पारवे,द्वारका पवार,रेशमा बागवान, मा.दत्ता भाऊ चेचर (बारा बलुतेदार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष) अविनाश काळे,शामल काळे, जाकिर तांबोळी,वैजीनाथ केसकर,संतोष चव्हाण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या