विशाल मोर्चात पोलीसांचा चोख बंदोबस्त
रवी भोंगाने साकोली
साकोली : न्यायालयाच्या निर्णय विरोधात विविध संघटनांचे बुधवार २१ ऑगस्ट या भारत बंद मोहिमेला साकोली बंद यशस्वी होण्यासाठी विविध संघटनांनी शहरात मोर्चा काढून आपल्या संवेदना व्यक्त कल्यात. जुनी पंचायत समिती गांधी चौकात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. याप्रसंगी साकोली पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त पोलीस, वाहतूक पोलीस व महिला पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालयाने ०१ ऑगस्टच्या निर्णयावर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्ग निर्माण व क्रिमिलियरची शर्त लागू करण्यात आली. या निर्णयामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना मिळणा-या आरक्षणाला नुकसान होऊ शकते. या विचारधारेतून होकाराची भावना ठेवणा-या संघटनेकडून साकोली शहर बंद करण्याचा निर्णय सर्व सामाजिक संघटनांनी घेतला. सर्व व्यापारी प्रतिष्ठान पूर्ण बंद ठेवण्यात आले. सर्व संघटनांच्या "भारत बंद.. साकोली बंद" ला व्यापारी बंधू, इतर प्रतिष्ठाने, शाळा कॉलेज, महाविद्यालय यांनी पूर्ण समर्थन देत कडकडीत बंद ठेवला. भारतीय बौद्ध महासभा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती, आदिवासी मुळनिवासी, नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन संघटना, कौमी एकता मंच, प्रबोधनकार कला साहित्य समिती, पंचशील महिला मंडळ, समता सैनिक दल, महामाया समिती, सावित्रीबाई महिला मंडळ, बहुजन वंचित आघाडी, बहुजन समाज पार्टी, बामसेफ संघटना, विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, बुद्धिजीवी वर्ग तथा समस्त नागरिकांनी या मोर्चाचे आयोजन केले होते. सदर मोर्चा सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती येथून प्रारंभ करून नागझिरा रोड, प्रगती कॉलनी, बसस्थानक, नगरपरिषद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गोवर्धन चौक, लाखांदूर रोड ते जूनी पंचायत समिती राष्ट्रपिता महात्मा गांधी चौकात सभा आयोजित करून मोर्चा संपन्न करण्यात आला.
सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे यांना निवेदन दिले. शहरात भारत बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस अधिक्षक सुशांतकुमार सिंह व पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, पोलीस नायक, पोलीस शिपाई, महिला पोलीस व वाहतुक पोलीस यांचा सकाळपासूनच शहरात विविध सार्वजनिक ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात केलेला होता.


0 टिप्पण्या