Ticker

6/recent/ticker-posts

बदलापूर शहरातली आदर्श विद्यालय येथे झालेली घटनांचा निषेध व्यक्त करत आरोपीला फाशीची शिक्षाच झाली पाहिजे.दलीत पँथर संघटनेची मागणी.!



दलीत पँथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष मनोज गायकवाड यांची मागणी...


सोनू संजीव क्षेत्रे चित्रा न्युज

बदलापूर - बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेच्या शिशू वर्गातील दोन विद्यार्थिनींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरकरांनी मंगळवारी ‘बदलापूर बंद’ची हाक दिली होती. मात्र, सकाळी सहाच्या सुमारास हजारोच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाला शाळा प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी रेल्वेरुळांवर ठिय्या मांडला.
रेल्वे स्थानकातील प्रवाशांनीही आंदोलनात उडी घेतल्याने आंदोलनाची तीव्रता वाढली. पोलिस प्रशासनाकडून समजूत घालण्याचा आणि काहीसा बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर या आंदोलकांनी थेट पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे आंदोलनास हिंसक वळण लागले. प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत आंदोलन सुरू राहिल्याने अखेर पोलिसांनी आक्रमक रूप धारण करून आंदोलकांवर बळाचा वापर करून दहा तासांनंतर रेल्वेमार्ग मोकळा केला. तसेच या घटनेचा दलित पँथर संघटन जाहीर निषेध व्यक्त करत आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या