श्रीकांत बारहाते हिंगोली
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील गिरगाव येथे आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सर्व सामाजिक संघटना यामध्ये उतरल्या होत्या, यात भिम आर्मी, संविधान आर्मी, आजाद समाज पार्टी, व तसेच एसी एसटी समाजातील सर्व कार्यकर्त् व समाज बांधवांनी या संदर्भात आवाज उठवत सहभाग नोंदवला होता.
या वेळी भीम आर्मी आजाद समाज पार्टी चे जिल्हा अध्यक्ष किशन खरे, संविधान आर्मी उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, सर्कल प्रमुख अनिकेत दवणे, सामाजिक कार्यकर्ते माधव डवरे, प्रमोद कुंटे, अनिल डवरे, आकाश दवणे, अमोल कुंटे, विठ्ठल डवरे, भोजाजी कसबे, विशाल डवरे, नागेश खंदारे, विशाल कुंटे, धम्मरत्न दवणे पत्रकार रवि कुंटे, राजु लामटीळे, विठ्ठल जोगदंड आदी बांधवांची उपस्थिती यावेळी दर्शनीय होती. तसेच यावेळी कुरूंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे, बिट जमादार बाभळे व पोलीस कर्मचाऱ्यांसह यावेळी दाखल झाले होते.
सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीयाचे अ ब क ड असे वर्गीकरण करून क्लिमीलेअरची अट लादून मूलभूत अधिकारांनवर गदा आणली आहे. त्या विरोधात विविध सामाजिक संघटना यात भिम आर्मी,आजाद समाज पार्टी, संविधान आर्मी, व एसी एसटी कार्यकर्ते बांधवांनी गिरगाव येथे सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत व्यापारी दुकानदाराने या भारत बंदला सहकार्य करून या बंद ला आपली दुकाने बंद ठेवून शांततेचे सहकार्य केले.


0 टिप्पण्या