Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞

‌इसवी सन २०२४ -  ७ ऑगस्ट, 
‌शालिवाहन शक १९४६, विक्रम संवत २०८०
‌भा. रा. १६ श्रावण, १९४६
युगाब्द ५१२६       
संवत्सर नाम : क्रोधी
अयन : दक्षिणायण 
ऋतू : ग्रीष्म 
मास: श्रावण
पक्ष:  शुक्ल   
तिथी: तृतीया (२२.००) ~ चतुर्थी      
वार:   बुधवार
नक्षत्र: पूर्वा (२०.३०) ~ उत्तरा     
राशी:  सिंह (२७.१५) ~ कन्या 

*बुध पूजन*
*मधुस्रवा तृतीया* 
हरियाली तृतीया  
झुला तृतीया 
*स्वर्णगौरी व्रत*

*राष्ट्रीय हातमाग दिन*
*रवींद्रनाथ ठाकूर स्मृतीदिन* 

१७५३: ब्रिटीश वस्तुसंग्रहालयाची स्थापना करण्यात आली.
१७८९: अमेरिकेच्या सरकारी युद्ध विभागाची स्थापना झाली.
१९४७ : थॉर हायरडाल व त्याच्या चमूने बाल्सा लाकडाच्या तराफ्यातून १०१ दिवसात पॅसिफिक समुद्र पार केला.
१९४७ : मुंबई महापालिकेने  बेस्ट कंपनी आपल्या अधिकारात घेतली.
१९७६ : व्हायकिंग २ हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत आले.
१९८१: सलग १२८ वर्षे प्रकाशित झाल्यावर द वॉशिंग्टन स्टार हे वृत्तपत्र बंद पडले.
१९८७: अमेरिका ते सोव्हिएत संघ पोहून पार करणारे लिन कॉक्स हे पहिले व्यक्ती ठरले.
१९९१ : वर्ल्ड वाइड वेबचे लोकार्पण.
१९९१: जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसर्‍यांदा यशस्वी चाचणी झाली.
१९९८: अतिरेक्यांनी दार-ए-सलाम, टांझानिया व नैरोबी, केनिया येथील अमेरिकन वकिलातींवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात २१२ लोक ठार झाले.
२००० : ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलने संयुक्त विजेतेपद मिळवले.

जन्मदिवस
१८७१: जलरंगचित्रकार, रविंद्रनाथ टागोर यांचे काका अवनींद्रनाथ टागोर 
१८७६: पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर माता हारी 
१९२५: भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि पूर्व केन्द्रीय कृषी मंत्री डॉ. मनकोम्बू साम्बसिवन तथा एम. एस. स्वामीनाथन,  हरित क्रांतीद्वारे भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. जगभरातील सुमारे ४२ विद्यापीठांनी त्यांना ’डॉक्टरेट’ ही पदवी दिली आहे. पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण या सन्मानांखेरीज, रॅमन मॅगसेसे, वर्ल्ड फूड प्राइझ व इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेले आहे.
१९३६: दोन वेळा अश्डन पुरस्कार विजेते डॉ. आनंद कर्वे.
१९४८: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व प्रशिक्षक ग्रेग चॅपेल.
१९६६: विकिपीडियाचे सह-संस्थापक जिमी वेल्स.

मृत्यूदिन
१९३४: जॅक्वार्ड लूम चे शोधक जोसेफ मॅरी जाकॉर्ड 
१९४१: रवींद्रनाथ टागोर जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ञ, तत्वचिंतक, थोर पुरुष व पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते 
१९७४: भेंडीबाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका अंजनीबाई मालपेकर
 २००९: भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील गीतकार आणि अभिनेते गुलशन बावरा.
२०१८: एम. करूणानिधी, भारतीय लेखक आणि राजकारणी तसंच, तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री.

*।। दास-वाणी ।।* 

तपीळपण धरूं नये । 
भांडविता भांडों नये । 
उडवितां उडवू नये । 
निजस्थिती आपुली  ।। 

हासवितां हासों नये । 
बोलवितां बोलों नये । 
चालवितां चालों नये । 
क्षणक्ष्णा  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १४/०१/१७-१८ 

निस्पृह महंताने कधी रागावता कामा नये. खरा निरिच्छ असेल तर मनाविरूद्ध घटनेने संतापायचे कारणच नाही. भांडकुदळ समोर आता तरी महंत शांतच हवा. निजस्थिती म्हणजे महंताने मनाचा समतोल प्रतिकूल परिस्थितीमधेही राखलाच पाहिजे.

पांचट लोकांसोबत हसण्या खिदळण्याची सवय महंताला नसावी. लोकांमधील त्याची प्रतिष्ठा अशाने उडून जाईल. बोलाला बोल म्हणून बेताल बडबड महंताची महती कमी करेल. कोणी नुसते चल म्हटले तर हातातले काम सोडून महंत जर निघाला तर एक ना धड भाराभर चिंध्या अशी स्थिती निर्माण होऊन महंताची विश्वासार्हताच संपुष्टात येईल. त्याच्या निस्पृहतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल.

*निस्पृहलक्षण समास.*

*माहिती विशेष*
*रवींद्रनाथ टागोर - उर्फ रवींद्रनाथ ठाकूर* (बंगाली: রবীন্দ্রনাথ ঠাকুর उच्चार: रोबीन्द्रनाथ ठाकूर) (मे ७, १८६१ - ऑगस्ट ७, १९४१) ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मो पंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियाचे पहिले नोबेलविजेते होते.

*संकलक : सुधीर देशपांडे (आबा)*

   🙏 💐💐💐💐💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या