Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रात १/ऑगष्ट /२०२४ पासून महसूल पंधरवडा सुरू आहे.

राजेश येसेकर भद्रावती

भद्रावती : महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी,नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त,यांनी कायद्याच्या बाहेर जाऊन नियमबाह्य व बेकायदेशीर कामे चिरीमिरी घेऊन, जनतेला नाहक त्रास देऊन, ACB , मध्ये पकडून जेल मध्ये जाऊन समाजात, कुंटूबात बदनाम होण्यापेक्षा,व स्वाभिमान गमवून जगण्यापेक्षा, भारतीय संविधानाने दिलेले अधिकार व कर्तव्य पार पाडत,माझ्या प्रमाणे आपले कर्तव्य पार पाडुन,जनहीताचे कामे करून,आपले नाव,चंद्रपूर जिल्ह्यात नाही, तर महाराष्ट्रात, आणि भारतात, करावे असे मला वाटते. 
कुठलीही चांगल्या कामाची सुरुवात आपल्या पासुनच करावी, नंतरच अधिकार वाणीने समाजाला, अधिकारी व कर्मचारी यांना सांगावे

मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी कायद्याच्या बाहेर जाऊन नियमबाह्य व बेकायदेशीर कामे करु नये, स्वतः पासूनच सुरुवात करावी, तसेच महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी सुद्धा आपले कर्तव्य पार पाडावे
तुम्ही जनतेचे नौकर , लोकसेवक आहात,मालक नाही हे प्रथम लक्षात घ्यावे. 
दिनांक ३१/०७/२०२४ रोजी माननीय राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग नई दिल्लीचे सदस्य यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील आढावा बैठकीत, नियोजन भवन येथे विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तलाठी पटवारी तथा फिर्यादी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. 
कुंसूबीचा आदिवासीनां ४२वर्षापासुन न्याय व हक्क जिल्हाधिकारी चंद्रपूर माननीय श्री.विनय गौडा साहेब यांनी का दिला नाही,???? माननीय आयोगाने निर्देश देऊनही मागील एक वर्षापासून न्याय व हक्क जिल्हाधिकारी चंद्रपूर का देत नाही???
असा प्रश्न विनोदकुमार खोब्रागडे यांना उपस्थित केला तेव्हा तात्काळ २४तासाचा आत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी निर्णय द्यावे असे सभागृहात मिठींग मध्ये सांगितले. 
आज तिन दिवस होऊनही जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.विनय गौडा जी सी यांनी जानीवपुर्वक कुंसूबीचा आदिवासीनां न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. यापूर्वी बोगस व बनावट शपथपत्र जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे करून दिले होते व कुंसूबीचा आदिवासीवर अन्याय केला होता. 
जर भारतीय संविधानातील अनुच्छेद ३३८A नुसार माननीय राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग नई दिल्ली यांची स्थापना आदिवासींना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी झाली आहे, दिवाणी न्यायालयाचे अधिकार त्यांना दिले आहे,
तर तात्काळ कर्तव्यात कसूर केल्यामुळे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा वर अट्रासिटीचा कलमानुसार फौजदारी कारवाई करावी अशी पुन्हा तक्रार विनोदकुमार खोब्रागडे व कुंसूबीचा आदिवासी यांनी आयोगाकडे केली आहे. 

महाराष्ट्रात महसूल पंधरवडा सुरू आहे, म्हणून माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी आतातरी कायद्याच्या बाहेर जाऊन नियमबाह्य व बेकायदेशीर कामे न करता, गरीब, वंचित, प्रकल्पग्रस्त, आदिवासी यांना न्याय व हक्क मिळवून द्यावे व आपले कर्तव्य पार पाडावे

तलाठी, मंडळ अधिकारी,व महसूल कर्मचारी यांनी भ्रष्टाचार करून ACB मध्ये पकडून जेल मध्ये जाऊन बदनाम होन्यापुर्वी, माझ्या प्रमाणे जनहीताचे कामे करून चंद्रपूर जिल्ह्यात, महाराष्ट्रात, भारतात,नाव कमवावे देशहितासाठी समाजहितासाठी राष्ट्रबांधनीसाठी. सर्व अधिकारी, कर्मचारी,व समाज बांधव जागृत राहावे व आपले कर्तव्य पार पाडावे
संघर्षी आयु विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तलाठी पटवारी तथा प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा RTI कार्यकर्ते वरोरा चंद्रपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या