Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय आयुर्विमा महामंडळ वतीने जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण


रवी भोंगाने साकोली
साकोली : भारतीय आयुर्विमा महामंडळ नागपूर विभागीय कार्यालय अंतर्गत  साकोली शाखेतर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जमनापुर प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 
          वृक्षारोपण कार्यक्रम एल आय सी साकोली शाखाधिकारी महेश पांढरे  यांच्या उपस्थित पार पडला.  प्रसंगी साकोली शाखेतर्फे सहायक शाखाधिकारी शुभम शहारे, उपस्थित कर्मचारी वर्ग चंदु लिखार, अमर आंबटकर, शशांक हटनागर, तनय थानथराटे व अभिकर्ता मार्कड भेंडारकर सी एल आय ए हे हजर होते. प्रामुख्याने कार्यक्रमाला  जि. प. प्राथ. शाळा जमनापुर मुख्याध्यापिका पी.एन. हजारे, सहाय्यक शिक्षकगण एस. एस. भाजीपाले, अंगणवाडी सेविका के. यु. साखरे, मदतनीस पी. एस. घरोटे, वैशाली साखरे, निलिमा साखरे, गणेश टिकेकर, ग्रा. पं. सदस्य राकेश घोरमारे, पोलीस पाटील भोजराम देशमुख उपस्थित होते. येथे जिल्हा परिषद सदस्या शितल राऊत, महिला कॉंग्रेस तालुकाध्यक्षा छाया पटले उपस्थित होते. येथे उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या सहभागाने विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन सीएलआय मार्कड भेंडारकर व साकोली शाखेचे  चंदु लिखार यांनी केले. आपल्या भाषणात शाखाधिकारी महेश पांढरे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील लोकांनी विशेष करून भारतीय आयुर्विमेच्या विविध योजना व जीवन विमा क्षेत्राशी जुळावे आणि विमा क्षेत्रात काम करण्यासाठी समोर यावे असे आव्हान देखील केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या