संघदिप मेश्राम चित्रा न्युज
मुंबई :- - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले हे चार दिवसांचा दुबई दौरा यशस्वी पूर्ण करून मुंबईत आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले आमदार रामदास आठवले यांचे मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होतात रिपब्लिकन पक्षाच्या मुंबईतील कार्यकर्त्यांनी नामदार रामदास आठवले यांचे भव्य स्वागत केले. रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या नेतृत्वात मुंबईतील रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात आमदार रामदास आठवले यांचे विमानतळावर भव्य स्वागत केले
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे मुंबई विमानतळावर स्वागत करण्यासाठी मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे जिल्हाध्यक्ष प्रकाश कमलाकर जाधव यांच्या नेतृत्वात भव्य पुष्पहाराने नामदार रामदास आठवले यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे रतन अस्वारे; बाबुराव बनसोडे; जयंतीलाल गडा; हरिकुमार नायर कडू पठारे; सम्यक कासारे ; तालुकाध्यक्ष सुनील पवार ; दीपक साळवी; रितेश घायवट; प्राध्यापक अर्जुन माघाडे; दिनेश शिंदे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.


0 टिप्पण्या