Ticker

6/recent/ticker-posts

गुणवंत विद्यार्थिनी सुमन कच्छवाय कडून ध्वजारोहण

गडेगाव जिल्हा परिषद शाळेतील प्रकार 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा -  स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ९ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत देशभरात 'हर घर तिरंगा' अर्थात 'घरोघरी तिरंगा' अभियान राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या १३, १४ आणि १५ ऑगस्ट रोजी लाखनी तालुक्यातील नागरिकांनी आपापल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्या प्रीत्यर्थ ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत ’ 14 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा गडेगाव येथे. गुणवंत विद्यार्थिनी कुमारी सुमन महेंद्रकुमार कच्छवाय हिच्या हस्ते ध्वजरोहन  करण्यात आले. यावेळी गडेगाव येथील महिला सरपंच वर्षा रेहपाडे , उपसरपंच प्रमोद कुथे, ग्रामसेवक गायधनी, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र कच्छवाय, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राकेश फसाटे, जि.प. शाळेचे मुख्यध्यापक भाजीपाले, तसेच शाळेतील   शिक्षकवृंद यांचेसह बहुसंख्येने गावकरी उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या