Ticker

6/recent/ticker-posts

माढा येथील खरात बंधूंची तिसरी पिढी ही देत आहे भीम गीत गायनाची सेवा

सोमनाथ खंडागळे सोलापूर

सोलापूर :-जिल्ह्यातील माढा तालुक्यातील खरात बंधू यांची तिसरी पिढी आजही महाराष्ट्रातील प्रत्येक गावात घरोघरी जाऊन भीम गीत गायनाची सेवा देत आहेत 
अतिशय प्रतिकूल परिस्थिती उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसलेले मोलमजुरी करून जगणारे हे खरात बंधूंचे कुटुंबातील आज ही तिसरी पिढी विश्वरत्न
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती स्वतः लिहिलेली गाणी त्यांच्या सुरेल आवाजात व तालबद्ध 
रचनेमध्ये सादर करून. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजाच्या घराघरात पोहोचवतात. 
जुनि आजोबा पणजोबाच्या काळातील 
वाद्य त्यांनी आजही कशीबशी जपलेले आहेत परंतु त्या वाद्यांची दुरअवस्था पाहता खरोखरच हे कलाकार किती उपेक्षित आहेत हे जाणवते.शासन दरबारी अशा उपेक्षित कलाकारांची नोंद न झाल्यामुळे अशा कलाकारांना शासनाकडून कोणतीही मदत अथवा मानधन मिळत नाही.
पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी व मिळेल ते काम करतात .व वर्षातून दोन महिने.
हे कलाकार महाराष्ट्रातील गावोगावी फिरून गायनाची कला सादर करतात व त्यातून थोडेफार पैसे धान्य मिळवतात.हालाखीची परिस्थिती असल्यामुळे जेमतेम जिल्हा परिषद शाळेपर्यंतच यांचे शिक्षण होते.
उच्च शिक्षणापासून मात्र हे लोक वंचित राहतात.
अशा या उपेक्षित कलाकारांना शासन दरबारी न्याय मिळावा अशी या माध्यमातून अपेक्षा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या