Ticker

6/recent/ticker-posts

पेसा भरतीसाठी आंदोलन करायला नंदूरबार मधील एकही राजकीय पक्षाच्या नेत्यांत दम नाही- सुशिलकुमार पावरा


संजय देशमुख चित्रा न्युज
शहादा : पेसा भरतीचा मुद्दा राज्यभर गाजत असताना मात्र आमचे नंदूरबार जिल्ह्य़ातील राजकीय नेतेमंडळी,आमदार, खासदार झोपलेले आहेत.माजी आमदार जे.पी .गावित यांच्या नेतृत्वात नाशिक जिल्ह्यात ठिक ठिकाणी रस्ता रोको,चक्का जाम आंदोलन सुरू आहेत. नाशिक सुरत महामार्ग बंद आहे.स्वतः जे.पी.गावित आदिवासी विकास भवन नाशिक समोर आमरण उपोषणाला बसले आहेत. पालघर व ठाणे भागात आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वात मुंबई सुरत मार्गावर चक्काजाम आंदोलन सुरू आहे.राज्यभर आंदोलन सुरू असताना नंदूरबार जिल्ह्य़ातील आदिवासी नेतेमंडळी मूक गिळून आहेत. नंदूरबार जिल्ह्य़ातील आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे निष्क्रिय मंत्री आहेत, समाज त्यांच्याविरुद्ध आहे.काँग्रेस चे के.सी.पाडवी कधीच समाजाच्या विषयावर बोलत नाहीत. ऐके काळी नंदूरबार जिल्ह्याचा ढाण्या वाघ म्हणून ओळखले जाणारे आमशा पाडवी हे सरकार मधील शिवसेना शिंदे गटात गेल्यानंतर त्यांचाही आवाज दबला.पेसा भरतीचा मुद्दा उचलण्यात एकाही राजकीय नेत्यांत दम नाही.
       २३ ऑगस्ट २०२४ रोजी नंदुरबार मध्ये आदिवासी संघटनांकडून पेसा भरतीसाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.परवानगी नाकारून मोर्चा दाबण्याचा प्रयत्न झाला.तरी मोर्चा यशस्वीरित्या काढण्यात आला.या मोर्चास एकही आदिवासी आमदार, खासदार आला नाही.कारण यांना पेसा भरती मुद्दा महत्वाचा वाटत नाहीत. 
                   ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनी डिजे बॅन्ड वाजा आणून गर्दी करणारे नेते आता गायब झाले.ते आंदोलन स्थळी गाड्या का पाठवत नाहीत? गर्दी करत नाहीत?ग्रामपंचायत ही तशाच करीत आहेत. दरवर्षी १५-२० लाख रूपये पेसा निधी खर्च करताना सरपंच व सदस्य हे ऐकमेकांची डोकं फोडायला मागे पुढे बघत नाहीत. आज मात्र पेसा निधी वाचवायची वेळ आली तेव्हा साधी एक गाडी सरपंच आंदोलन स्थळी पाठवत नाहीत, याची लाज वाटायला पाहिजे. पेसा भरतीचा विषय हा नोक-या पुरता मर्यादित नाही,तर पेसा कायदा,पेसा निधी,पेसा योजना,पेसा आरक्षण धोक्यात आहे.ते वाचवण्याची जबाबदार प्रत्येक आदिवासी बांधवांची आहे.म्हणून पक्ष,संघटना,मतभेद विसरून सगळ्यांनी पेसा भरतीच्या आंदोलनात एकजूटीने शामिल व्हायला पाहिजे,रस्त्यावर उतरायला पाहिजे, अभी नही तो कभी नही,आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहोत, तुम्ही रस्त्यावर उतारा ,रास्ता रोको करा,चक्का जाम करा,सर्व शासकीय कार्यालये बंद करा,ग्रामपंचायत बंद करा,पेसा कायदा वाचवा.उठ आदिवासी जागा हो,पेसा कायदा वाचवण्याचा धागा हो! ,,असे जाहीर आवाहन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी नंदूरबार मधील आदिवासी बांधवांना केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या