Ticker

6/recent/ticker-posts

भावी मुख्यमंत्र्यांचे साकोली विधानसभा क्षेत्र हॉय होल्टेज मोडवर


मागोवा निवडणुकीचा -- 

रवि भोंगाने साकोली

साकोली :-मागील भागात म्हटल्याप्रमाणे राजकीय क्षेत्र हे अस्थिरतेने भरलेले क्षेत्र आहे. राजकारणा एवढी अस्थिरता दुसऱ्या कोणत्याच क्षेत्रात बघायला मिळत नाही. क्षणात "अर्ष ते फर्ष पर "अशी अवस्था राजकारणात नेहमीच पाहिली जाते. राजकारणात जशी सत्ता कायम नसते तसे पद देखील कायम नसतात तसेच मैत्री आणि शत्रुत्वही कायमस्वरूपी नसते. राजकीय क्षेत्रात मतलब पाहून मैत्री आणि शत्रुता केली जाते. कोणे एकेकाळी हाड वैरी असलेले राजकीय शत्रू क्षणार्धात पक्के मित्र होत असतात. एकूणच राजकीय क्षेत्रात कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी नसते. त्याप्रमाणे जस जशी निवडणूकीची तारीख जवळ येईल तस तसे अनेक भावी उमेदवाराचे बि.पी, शुगर हॉय होत जातील. आतापासून साकोली क्षेत्रात उमेदवाराचे राजकीय युद्ध सुरू झाले आहे. त्यानुसार साकोली विधानसभा क्षेत्र हॉय होल्टेज मोडवर दिसून येत आहे. सध्या इतर विधानसभा क्षेत्रापेक्षा साकोली विधानसभा सोसल मिडियावर, युट्यूब बातम्या मधून हायजॅक झाले. भावी मुख्यमंत्र्याचे विधानसभा क्षेत्र म्हणून या क्षेत्राकडे बघितल्या जाते. मात्र भाऊंचा यावेळी कस लागणार आहे. नाना भाऊंना राजकीय खिंडीत गाठण्यासाठी भाजपचे अनेक मावळे दबा धरुन बसले आहेत. इकडे भाजपमध्ये उमेदवारीसाठी कुरघोडी सुरु आहे. उमेदवारीचा दावेदार मीच आहे अशा अविर्भावात सर्वच दिसून येतात. पण हमखास कुणीच सांगायला तयार नाही. मात्र एक गोष्ट नक्की डॉ. परिणय फुके हे विधानपरिषदवर गेल्याने ते दुसऱ्यांदा साकोली विधानसभा लढविण्यास इच्छूक असतील असे वाटत नाही. कदाचित तिकीट कुणाला द्यायची हे त्यांच्यावरच असेल. साकोली विधानसभा क्षेत्रात तेली समाजाचे प्रतिनिधीत्व नेहमीच डावलल्या गेले. कारण काय तर कुणबी समाजाची संख्या या क्षेत्रात अधिक आहे आणि दुसरे  कारण तुमसर विधानसभा क्षेत्रात तेली समाजाला पक्ष प्रतिनिधित्व देत असल्याने. त्यामुळे तेली समाजाच्या आणि उमेदवाराच्या बाबतीत साकोली विधानसभा क्षेत्रावर नेहमीच गडांतर येते. पात्रता आणि क्षमता असूनही पक्षांकडून अन्याय सहन करावा लागतो. मग ओबीसी जातिनिहाय मतदार संख्येत क्रमांक ३ वर असलेल्या समाजाला प्रतिनिधीत्व कसे मिळते असे मतदार बोलू लागलेत. असो, परंतू आपण एका गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहोत. फक्त केवळ भाजप डोक्यात घेऊन चालणार नाही. भाजप - शिंदे - अजित पवार गट डोक्यात घेऊ चालावे लागेल. अशावेळी या गटाने कुणबी रुपात अविनाश ब्राम्हणकर आणि सुनिल फुंडे यांचा विचार केला तर. कुणबी विरूद्ध कुणबी. शेवटी हे राजकारण आहे. राजकारणाचा रस्ता पहिजे तेवढा सरळ नाही. येथे तिरकीच चाल चालत असतात. लोकसभेच्या निवडणूकीत विद्यमान भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार म्हणजे त्यावेळेसचे डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी मिळेल हे शेवटपर्यंत कळले नाही. त्यामुळे हाच डबल गेम भाजप- शिदे -अजित पवार गटातून अविनाश ब्राहणकर किंवा सुनिल फुंडे यांच्या रुपात खेळला गेला तर. दुसरीकडे साकोलीत नव्याने स्थिरावत असलेले भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुध्ये संघटनात्मक कार्यात व्यस्त असतांना एक दिड महिन्यात लाडली बहणच्या बॅनर आणि प्रकाश पर्वच्या टी शर्टवर अवतरले. याचा अर्थ त्यांची इच्छा लपून राहिलेली नाही. विधान सभेच्या राजकीय आराखड्यात तेही दंड थोपटून उभे आहेत. या मागे त्याचा राजकीय गुरू कोण ? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे ? माजी आमदार बाळाभाऊ काशीवार मनापासून लढण्यास इच्छुक आहेत काय हे गुपितच आहे. म्हणजे सध्याला तरी राजकीय रंगपंचमीच्या खेळ भाजपमध्येच सुरू आहे. साकोली विधानसभा क्षेत्रात ओबीसी मतदानाची जातीनिहाय यादीची माहिती जर समोर आणली तर पहिल्या क्रमांकावर कुणबी, त्यानंतर तेली आणि कोहळी असा क्रम लागतो. असे असतांना तुमसर विधान सभेचे निमित्त करून साकोली विधान सभेतील तेली समाजाचे प्रतिनिधित्व नाकारणे हे तेली समाजावर अन्याय करण्यासारखे आहे असे मतदार आता बोलू लागले आहेत. मागील विधान सभेत डॉ. ब्रम्हानंद करंजेकर यांनी तिकीट मागीतली ती नाकारण्यात आली. अपक्ष म्हणून त्यांनी पूर्ण ताकदीनिशी तयारी केली. त्यावेळी ते अपक्ष म्हणून निवडून आले असते असे तिन्ही तालुक्यात बोलल्या जात होते. पण त्यावेळी पक्षश्रेष्ठींचा मान ठेवून त्यांनी नम्रपणे माघार घेतली. पण आता त्यांचे सुपूत्र वैनगंगा संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर हे दावेदारी मागतात. अशावेळी पक्षश्रेष्ठिनी त्यांच्या पाठीमागे उभे राहावे असा मतदार क्षेत्रात सूर आहे. अन्यथा पुन्हा भाजप येथून सिट गमवणार असे बोलल्या जाते. हार जीत हा नंतरचा प्रश्न ? पण तेली समाजाला या क्षेत्रात प्रतिनिधित्व देऊन या क्षेत्रात पक्षाने भरपाई करावी अशीच चर्चा आता जोर धरू लागली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील नवीन चेहरा म्हणून पटोले यांनी डॉ. प्रशांत पडोळे यांना हायटेक केले असेल तर उच्च विद्या विभूषीत आणि शैक्षणिक क्षेत्रातील नवीन चेहरा डॉ. सोमदत्त करंजेकर यांच्याकडे भाजपने बघायला काय हरकत आहे. मतदार क्षेत्रात जशी राजकीय हवा असते तसे वेळोवेळी लिखाण करायचे असते. वेगवेगळ्या नेत्यांशी मतदारांशी आणि कार्यकर्त्यांशी खाजगीत बोलण्याची अनेकदा संधी मिळते.
त्यातून बरेच काही कळते. कोण जिंकून येणार हा या घडीचा खेळच नाही. तो रंगायला अजून वेळ आहे. आजचा खेळ आहे तो तिकीट वाटपाचा. तिकीट आपल्याला कशी मिळेल याचे राजकीय डाव टाकने सुरू झालेले आहे. सध्याची लढाई ही आपसातच आहे. ती आपसातच खेळावी लागणार आहे. शत्रूच्या लढाईपेक्षा मित्रांचा सामना करणे कठीण जाणार आहे. दोस्ताना अजमावतांना कुठे कुठे दुश्मनांशी दोस्ती होऊ शकेल.सध्या डबल गेम सुरू झाला आहे. त्याचे पुढचे अंक लवकरच बघायला मिळतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या