Ticker

6/recent/ticker-posts

पिंडकेपार येथे राष्ट्रसेविका समितीतर्फे गुरू पौर्णिमा उत्सव

रवी भोंगाने साकोली
साकोली :-राष्ट्र सेविका समितीच्या पिंडकेपार शाखेतर्फे पिंंडकेपार येथील श्रीराम मंदिरात शनिवार दिनांक 3 ऑगस्टला  गुरुपौर्णिमा उत्सव कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद सदस्या दीपलता समरीत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख वक्त्या साधनाताई पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता व भगवा ध्वजाचे पूजन करून करण्यात आली .यावेळी प्रमुख वक्त्या साधनाताई पाटील यांनी राष्ट्रसेवा समितीचे कार्य सांगून गुरु चे महत्व पटवून दिले गुरु हा अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग दाखवतो तसेच गुरूमुळे मानवी जीवन कल्याणकारी बनते यासोबतच भगवा ध्वज हा आपली अस्मिता व सन्मानाचे चिन्ह आहे असे मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद सदस्य दीपलता समरीत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात देशाला बलवान व सशक्त बनवायचे असेल तर त्यात स्त्री शक्तीचा देखील सहभाग असणे गरजेचे आहे त्यासाठी स्त्रियांनाअधिक कार्यक्षमतेने काम करावे लागेल असे मार्गदर्शन केले. साकोली नगर कार्यवाहीका कल्पनाताई कापगते यांनीही मार्गदर्शन करताना सांगितले, राष्ट्रसेवा समितीची नियमित शाखा व योगाभ्यास या मुळे नारीशक्ती ही अधिक सशक्त व जागृत बनण्यास मदत होते. यासाठी प्रत्येक गावामध्ये राष्ट्रसेवा समितीची शाखा लागावी व त्यात नारीशक्ती ही मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावी तसेच राष्ट्रसेवा समितीच्या वतीने आपली भारतीय संस्कृती व संस्कार हे आजही टिकवून ठेवली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ममता भुजाडे यांनी केले कार्यक्रमाचे संचालन साकोली नगर कार्यवाही कल्पना कापगते यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्पना कापगते, बबीता भजे, शुभांगी भुजाडे, ममता भुजाडे यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचा समारोप ध्वज लावून प्रार्थना घेऊन करण्यात आला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या