Ticker

6/recent/ticker-posts

श्रीक्षेञ हंडरगुळीच्या महादेव मंदीरात जमला भक्तांचा मेळा ;

पहिला सोमवार ठरला दर्शन वार .....

विठ्ठल पाटील लातूर
लातूर :- यंदा श्रावण मास दि.५ जुलै पासुन सुरु झाला आहे.व हंडरगुळी येथील जाग्रत व नवसाला पावणारे मंदीर म्हणुन ओळख असलेल्या श्री.शंभो महादेव मंदीरात भल्या पहाटे पासुनच हजारो भाविकांनी दर्शना - साठी मोठी गर्दी केली होती.त्यात अभिषेक करणारे ही भक्त मंडळी मोठ्या प्रमाणात गोळा झाल्याचे पाहून श्रीक्षेञ हंडरगुळीत भक्तांचा मेळा जमला होता.आणी पहिलाच श्रावण सोमवार ठरला दर्शनवार. असे भक्तांमध्ये बोलले जात होते. यावेळी मंदीर प्रशासना तर्फे येणा-या भाविकांसाठी दुध,पाणी व अन्य सुविधांसह स्वतंञ दर्शन रांग यांची व्यवस्था केली होती.यावेळी हाळी सह परिसरातील भाविकांनी मंदीरात दर्शनासाठी गर्दी केली होती.तसेच या मंदीरापुढे श्रीफळ,अगरबत्ती,बेल, फुल,हळद-कुंकू,विभुती विक्रीचे स्टाॅल ही विक्रेत्यांनी लावले होते..
मराठी पंचागानुसार दि.५-८-२४ पासुन सुरु होणा-या श्रावण मासाला हिंदुधर्मात अन्नन्य साधारण म्हत्व आहे.यंदा ७१ वर्षानंतर श्रावणाचा प्रारंभ व समाप्ती हे सोमवारीच होत असल्याने हा एक दुर्मिळ योग आहे. तसेच यंदा पाच सोमवार आल्याने अनेकांनी श्रावण धरलाय.म्हणे.!
सर्वाथ सिध्दीसह श्रावणात 3 शुभ योगास प्रारंभ पहिल्या सोमवारी आहे व या योगात प्रारंभ होणा-या श्रावण महिण्यास अत्यंत शुभ मानले जाते. सर्वाथसिध्दी योगात श्रावण धरल्यास आर्शिवाद विशेषत: महादेवाचा शुभ आर्शिवाद मिळतो असे श्रध्दाळू भक्त म्हणतात.
हाळी,सुकणी,वायगाव,वडगाव,कीनी शेळगाव,चिद्रेवाडी,राचन्नावाडी,डोंग्रज,मोरर्तळवाडी,आडळवाडी,बोरगाव.शेळगाव,नागदरवाडी,चिमाचीवाडी यासह अनेक गावातील स्ञी-पुरुष शेकडो भक्त मंडळी हंडरगुळी येथील मंदीरात बारमाही दर्शनासाठी येतात. माञ,श्रावण महिणा सुरु झाल्यामुळे तर वरील गावातील व परिसरातील हजारो भक्त मंडळी येथे दर्शनासाठी भल्या पहाटे पासुनच येतात. 
*हर-हर महादेव* च्या गजरा ने हंडरगुळी नगरी दुमदुमली होती. *दर्शनासाठी स्वतंञ रांगा......*
येथील मंदीर हे नवसाला पावणारे आहे.म्हणुन दर्शनासह नवस बोलणे फेडणे यासाठी शंभो महादेवाच्या मंदीरात हजारो भाविकांची विशेषत: महिलांची श्रध्दा व गर्दी मोठी असते. म्हणुन मंदीर प्रशासनाने महिलां अण् पुरुष भक्तांना दर्शनासाठी स्वतंञ रांगाची व्यवस्था तसेच दुधाची पण स्वतंञ सोय केली म्हणुन अत्यंत शिस्तबध्द व भक्तिमय वातावरणात हजारो भाविकांनी *हर हर महादेव* असे गजर करीत दर्शन घेतल्यामुळे श्रावणातील पहिला सोमवार ठरला दर्शनवार .असे भक्तमंडळी म्हणतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या