(शहिद भगतसिंग,राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन)
विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज,,
नांदेड : २४ ऑगस्ट हा क्रांतिकारक शहीद शिवराम हरी राजगुरू यांचा जन्मदिवस.त्यांची जयंती डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नांदेड तालुका कमिटीच्या वतीने उपोषणाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालया समोर दि.२४ रोजी साजरी करण्यात आली.
शहीद राजगुरू यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड येथे झाला असून ते देशासाठी हसत हसत बलिदान देणारे महाराष्ट्रातील एकमेव क्रांतिकारक आहेत.
ते शहीद भगतसिंग यांच्या क्रांतिकारी आंदोलनाचे प्रमुख क्रांतिकारक होते.
त्यांची २४ ऑगस्ट रोजी जयंती.
त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय येथे शहीद भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.
यावेळी क्रांतिकारी घोषणा देऊन शहिदांच्या जीवनावर विचार मांडण्यात आले.
माकप,सीटू,जमसं आणि डीवायएफआय चे मागील २०० पेक्षा अधिक दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर विविध प्रलंबीत मागण्यासाठी साखळी उपोषण सुरु असून या उपोषणाच्या ठिकाणी अनेक महामानवांच्या जयंत्या आणि स्मृतिदिनाचे कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत.
यावेळी माकप तालुका सचिव कॉ. गंगाधर गायकवाड,डीवायएफआय तालुका निमंत्रक कॉ.जयराज गायकवाड,सुभाषचंद्र गजभारे, सोनाजी कांबळे,माधव दूधकावडे, बंटी दूधकावडे,गौस उर्फ बबलू खुरेशी,यासिन भाई आदींची उपस्थिती होते,,


0 टिप्पण्या