Ticker

6/recent/ticker-posts

अपंगाच्या न्यायासाठी अपंगाच्या हक्कासाठी पनवेल महानगरपालिकेच्या समोर रुद्र अपंग सामाजिक सेवा संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तीव्र आंदोलन व आमरण उपोषण ..!

दलित पॅंथर सामजिक संघटनेचे पनवेल शहर अध्यक्ष पंकज खरे  यांचा पाठिंबा 


पंकज खरे रायगड चित्रा न्युज
ठाणे :-एकीकडे महाराष्ट्र मध्ये अपंगाच्या दिव्यांगाच्या खोटे दाखले बनवून खोटे डॉक्युमेंट्स बनवून एमपीएससी यूपीएससी एक्झाम देऊन अपंगाचे हक्क मारण्यात येत आहे, दुसरीकडे महानगरपालिकेमध्ये ज्यांच्या मागे सत्ताधारी पक्षाचे पाठबळ आहे अशाच लोकांना किंवा अशाच लोकांच्या संघटनांना व्यवसाय परवाने देण्यात येत आहे, परंतु महाराष्ट्र मध्ये अशा अनेक संघटना आहेत अनेक दिव्यांग अनेक अपंग त्यांना डावडले जात आहे, अशीच एक संघटना म्हणजे रुद्र अपंग सामाजिक सेवा संस्था हे अपंगच्या न्यायासाठी अपंगाच्या मागण्यासाठी पनवेल महानगरपालिकेसमोर दोन दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे व त्यांच्या मागण्या रास्त असून त्यांच्या मागण्या मान्य कराव्या असे निवेदन दलित पॅंथर यांच्यामार्फत करण्यात आले आहे व रुद्र अपंग सामाजिक सेवा संस्था संस्थापक *अध्यक्ष* गजेंद्र अहिरे साहेब , उपाध्यक्ष खंडू लहाने साहेब यांना दलित पॅंथर चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांच्यावतीने पाठिंबा देण्यात आला आहे,
पाठिंबा देताना उपस्थित कार्यकर्ते 
पंकज खरे (पनवेल शहर अध्यक्ष), यश पाटील (पनवेल तालुका अध्यक्ष), सुशांत शिंदे (पनवेल तालुका कार्याध्यक्ष) सुरेंद्र गायकवाड (पनवेल तालुका संघटक), शैलेश सकट (पनवेल तालुका चिटणीस संघटक) देवानंद पवार (कळंबोली शहराध्यक्ष) व महिला कार्यकर्ता सुप्रियाताई कांबळे (पनवेल तालुका अध्यक्ष महिला) रेश्मा ताई कांबळे (पनवेल तालुका उपाध्यक्ष महिला) सोनाली ताई अंभोरे (कामोठे शहर अध्यक्ष महिला) इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या