Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞
‌इसवी सन २०२४ - २४ सप्टेंबर 
‌शालिवाहन शक १९४६, विक्रम संवत  २०८०
‌भा. रा. २ आश्विन १९४६.
युगाब्द ५१२६
संवत्सर नाम : क्रोधी
अयन: दक्षिणायण
ऋतू : वर्षा
मास : भाद्रपद 
पक्ष :  कृष्ण 
तिथी : सप्तमी (१२.४०) ~ अष्टमी
वार :   मंगळवार
नक्षत्र: मृग (२१.५०) ~ आर्द्रा                          
राशी:   वृषभ (१०.००) ~ मिथुन 

*अष्टमी  श्राद्ध*
*मध्याष्टमी  श्राद्ध*
*कालाष्टमी*

१६६४: नेदरलँड्सने न्यू ऍम्स्टरडॅम इंग्लंडच्या हवाली केले.
१८७३: म. फुले यांनी सत्य शोधक समाजाची स्थापना केली.
१९३२: दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याऐवजी सर्व प्रांतांमधे सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात असा प्रमुख राजकीय नेत्यांमधे करार झाला. त्यावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या आहेत. हा करार ’पुणे करार’ या नावाने ओळखला जातो.
१९४६: हाँगकाँग येथे कॅथे पॅसिफिक एअरवेज ची स्थापना झाली.
१९४८: होंडा मोटार कं ची स्थापना 
१९६०: अणुशक्तीवर चालणाऱ्या यू. एस. एस. एंटरप्राइझ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले.
१९९४: सॅटॅनिक व्हर्सेस या कादंबरीचे वादग्रस्त लेखक डॉ. सलमान रश्दी यांच्यावरील मृत्युदंडाचा फतवा मागे.
१९९९: कैगा अणूशक्ती प्रकल्पाचे दुसरे युनिट कार्यान्वित झाले.
२००२: गुजरात येथील अक्षर धाम मंदिरात आतंकवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सुमारे ३३ लोक ठार तर ८० पेक्षा जास्त नागरिक जख्मी झाले.
२००७: कर्णधार धोनीच्या नेतृवाखाली भारताने टी-२० विश्वकप जिंकला.
२०१४: मार्स ऑर्बिटरी मिशन (एमओएम) – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इसरो) प्रक्षेपण केलेल्या मार्स ऑर्बिटर ने मार्स ची कक्षा ओलांडली.
२०१५: मक्केत हज मध्ये चेंगराचेंगरीत ७१७ लोक मृत्यूमुखी.

जन्मदिवस 
१५३४  शिखांचे चौथे गुरू रामदास 
१५५१: प्रख्यात कवि दासो दिगंबर देशपांडे तथा दासोपंत 
१८६१: क्रांतिकारक, मॕडम भिकाजी कामा
१८७०: नीऑन लाईट चे संशोधक जॉर्जेस क्लॉड 
१८८९: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक केशवराव त्र्यंबक दाते 
१८९८: प्राच्यविद्यापंडित अनंत सदाशिव अळतेकर 
१९०२: इराणी धर्मगुरु आणि राजकारणी रुहोलह खोमेनी 
१९१५: चित्रपट व रंगभूमीवरील कलावंत प्रभाकर शंकर मुजूमदार, ’भारतवर्ष’, ’भगवानतिलक’, ’मृच्छकटिक’, ’वळवाचा पाऊस’, ’शारदा’ इ. अनेक नाटकांमधे त्यांनी भूमिका केल्या. 
१९२१: लेखक, समीक्षक व संपादक डॉ. सखाराम गंगाधर मालशे, त्यांनी एकोणिसाव्या शतकावर लिहिलेली ’गत शतक शोधताना’ आणि ’तारतम्य’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. डॉ. धनंजय कीर यांच्या साहाय्याने त्यांनी ’महात्मा फुले समग्र वाङ्‍मय’ संपादित केले आहे. 
१९२२ : 'सोबत'चे संस्थापक संपादक गजानन वासुदेव तथा ग.वा. बेहेरे
१९२४: अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष गुरू चरणसिंग तोहरा 
१९२४: भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे माजी सरचिटणीस आणि स्वातंत्र्यसेनानी अर्धेन्दू भूषण बर्धन
१९४०: इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू आरती साहा
१९५०. मोहिंदर अमरनाथ क्रिकेटपटू, समालोचक.
१९६३: दूरदर्शन समालोचक आणि पत्रकार,  गो न्यूज चॅनेलचे संस्थापक पंकज पचौरी.

मृत्यूदिन 
१९३९: युनिव्हर्सल स्टुडियो चे संस्थापक कार्ल लामेल्स् 
१९९८: बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते, दिग्दर्शक व कुशल संघटक, वासुदेव पाळंदे, पुण्यातील ’प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’, ’महाराष्ट्रीय कलोपासक’, ’जागर’ इ. नाट्यसंस्थांच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
२००२ : लेखक अनुवादक व शब्दकोशकार, श्रीपाद जोशी 

*।। दास-वाणी ।।* 

मज्यालसींत बैसों नये । 
समाराधनेसी जाऊं नये । 
जाता येळलिवाणें होये । 
जिणें आपुलें  ।। 

उत्तम गुण प्रगटवावे । 
मग भलत्यासी बोलता फावे । 
भले पाहोन करावे । 
शोधून मित्र  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १९/०२/१४-१५ 

मज्यालसी म्हणजे राजकीय चर्चा होते ते ठिकाण. महंताने अशा बैठकींमधे उघडपणे सहभागी होऊ नये. त्याने कधीच अन्नछत्रामधे जेवता कामा नये. त्यामुळे माणूस मिंधा होतो. उपकाराखाली दबतो. जीवन ओशाळल्यासारखे होते.

निस्पृहपणे राहून महंताने आपल्यामधील उत्तम गुण समाजामधे प्रकट केले की कोणाशीही तो बोलला तरी क्षणात तो त्याला आपलासा करून टाकतो. समाजातील चांगल्या लोकांची पारख करून महंताने त्यांच्याशी मैत्री जोडावी. आपल्या धर्मकार्यामधे त्यांनाही जोडून घ्यावे.

*विवरणनिरूपण समास.*

*संकलक : सुधीर देशपांडे  (आबा)*

 🙏 💐💐💐💐 💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या