Ticker

6/recent/ticker-posts

घरेलु कामगार महिलांनी विविध योजनेचा लाभ घ्यावा :- मा.बापू ओहोळ (संचालक.ग्रा.वि.के)

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098
         
जामखेड :- 26 सप्टेंबर 2024 रोजी संघर्ष घरेलु कामगार महिला संघटना जामखेड यांच्या वतीने घरेलू कामगारांचे नेतृत्व विकास व संघटना बांधणी प्रशिक्षण शिबिर मा. ओम प्रकाश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली निवारा बालगृह मोहा फाटा ता- जामखेड जिल्हा अहमदनगर येथे घेण्यात आले.
           यावेळी शिबिराच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे मा.बापू ओहोळ (संचालक ग्रामीण विकास केंद्र जामखेड) मा.वैजीनाथ केसकर (निवारा बालगृह अधीक्षक) मा.सौ द्वारका ताई पवार (ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या कार्यकर्त्या) मा.संतोष चव्हाण (व्यवस्थापक,निवारा बालगृह)उपस्थित होते प्रशिक्षण शिबिराची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन करण्यात आली. शिबिरासाठी जामखेड तालुक्यातील घरेलु कामगार जवळपास 33 महिला उपस्थित होत्या.
      यावेळी मा.बापू ओहोळ म्हणाले  की घरेलू महिलांनी काम करत असताना आपली संघटना करणे खूप महत्त्वाचा आहे.आपल्याला विविध योजनांची माहिती असणे गरजेचे आहे आपल्याला त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे महिलांनी घराबाहेर पडले पाहिजे अन्याय कोणीही सहन नाही केला पाहिजे तुमच्या पाठीशी भारतीय संविधान असल्यामुळे आपला हक्क अधिकार आपल्याला मिळालेच पाहिजे असे बापू ओहोळ म्हणाले.
         मा.ओम प्रकाश गिरी यांनी महिलांना विविध योजनेचा कशाप्रकारे लाभ मिळावा याबद्दल दिवसभर मार्गदर्शन केले तसेच संघटना कशी तयार करावी संघटने मध्ये किती ताकद असते महिलांनी आंदोलन मोर्चे कसे काढावे न घाबरता नीडभिड राहिले पाहिजे स्वतःच्या पायावर उभा राहिले पाहिजे असे सांगितले 
     प्रस्तावना द्वारका (ताई) पवार यांनी केली सूत्रसंचालन संतोष चव्हाण यांनी केले आभार वैजीनाथ केसकर यांनी मानले.
        यावेळी रेश्मा ताई बागवान, ऋषिकेश गायकवाड, बाळासाहेब सोलनकर, रोहित चंद्रकांत पवार, MSW महाविद्यालय अहमदनगर येथील विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या