Ticker

6/recent/ticker-posts

गार्डन चौकातील घाणीचे साम्राज्य हटवा - बीडीओंना निवेदन

वलमाझरी येथे मुलांचे आरोग्य धोक्यात ; सामाजिक कार्यकर्ता विलास लांजेवार यांचे निवेदन 

रवी भोंगाने साकोली
साकोली : वलमाझरी येथील गार्डन चौकातील शेणाच्या गडदी व झालेले घाणीचे साम्राज्य हटविण्याबाबद ( सोम. ०९ सप्टे.) ला खंडविकास अधिकारी पी. व्ही. जाधव यांना वलमाझरी येथील जागरूक नागरिक विलास लांजेवार यांनी दिले. आणि या संतप्त प्रकरणी जर लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला तर स्थानिक ग्रामपंचायतला दोषी ठरविण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. 
       वलमाझरी मुख्य गार्डन चौकात व काही घरांबाजूला ग्रामपंचायतने गार्डन चौक महणून नाव दिले. परंतु त्या ठिकाणी गार्डन नसून तिथे शेणाचे गडदी असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे व त्यापासून शेणाचा उग्र वास घरात पोहचून वातावरण दूषित होऊन डेंगूचे प्रमाण वाढत आहे. गावात डेंगूचे रूग्ण आहेत याची कल्पना एक वर्षापासुन ग्रा. पं. ला. तकार देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. शेणखताचे खड्डे हे सरपंचाचे संबधीत व्यक्तीचे असल्याने ग्रामपंचायत त्यांच्यावर कारवाई करत नाही अशी गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. या गंभीर विषयी त्वरीत यांच्याकडे लक्ष देऊन आमच्या आरोग्याची होत असलेले आजार थांबवीण्यासाठी त्वरीत उपाययोजना करावी. अन्यथा पसरलेल्या घाणीचे साम्राज्यातून लहान मुलांना विविध रोगांची लक्षणे व यातच कुणासोबत जीवितहानी झाली तर याला सर्वस्वी जबाबदार गटग्रामपंचायत वलमाझरीच राहील असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी आरोग्य विभाग, भंडारा यांनाही देत या गंभीर प्रकरणी तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी जागरूक सामाजिक कार्यकर्ता विलास लांजेवार यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या