Ticker

6/recent/ticker-posts

भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ विकणाऱ्यावर कारवाई केव्हा?


रवी भोंगाने साकोली
 साकोली :-सध्या सणवाराचे दिवस सुरू आहेत. या दरम्यान बहुतांश नागरिक दुग्धजन्य पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. परंतु अनेकदा हे पदार्थ भेसळ करून विकल्या जातात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. अशा भेसळ करून दुग्धजन्य पदार्थ विकणाऱ्या दुकानदारावर कारवाई होणार काय असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. सध्या जिल्ह्याभर सण आणि उत्सवाचे वातावरण आहे. काही महिन्यांवर दसरा आणि दिवाळी आहे. सण उत्सवात आपल्या पदार्थांची विक्री व्हावी असा उद्देश ठेवून दुकानदाराकडून विक्रीसाठी दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात. परंतु काही दुकानदार मात्र या पदार्थात मिलावट करून पदार्थांना विक्रीसाठी ठेवतात. ग्राहकांना आपण कशी वस्तू घेतो याची पुसटशी कल्पना देखील येत नाही. सण उत्सवाच्या नादात हे पदार्थ घरी आणले जातात.  काही पदार्थ भेसळ केल्याने खाणे योग्य नसते. मात्र नंतर आरोग्यावर परिणाम झाल्यावर या भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थाची खात्री पटते. पण  तेव्हा वेळ निघून गेलेली असते. जनतेच्या आरोग्याचा विचार करता संबंधित विभागाने अशा दुकानदाराची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या