कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- साकोली विधानसभा क्षेत्रातील एका नामवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्यांनी परदेशात शिक्षण घेत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचार आणि प्रसार केला म्हणून त्याला एका राजकीय पक्षाकडून तिकीट देण्यात येणार असली तरी त्याचेच आयोजनात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या श्रीलंकेतून येणाऱ्या पवित्र अस्थिधातू दर्शनार्थ अस्थीकलश महायात्रेचे सोमवारी दुपारी विपश्यना साधकाने आपल्या संस्थेच्या परिसरात आयोजन केल्याने चर्चेचा विषय झाला असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हस्तक तथागताचे प्रेमात पडल्याचे दिसून येते. हे प्रेम दिखावा की निर्मळ ? या बाबद शंकाकुशंका पेव फुटले आहे.
सध्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्याच्या मार्गावर असून आपल्याला उमेदवारी मिळावी. या करिता सर्वच राजकीय व प्रादेशिक पक्षात इच्छुक असणाऱ्यांनी विविध समाजाच्या जनसमुदायाशी संपर्क सुरू केला आहे. त्यात काहींनी धर्मासह श्रद्धेचा आधार घेतला असल्याचे चित्र साकोली विधानसभा क्षेत्रात दिसत आहे. साकोली विधानसभा क्षेत्रात एका राजकीय पक्षात अनेक इच्छुक उमेदवार असून त्यांचेतील काही जणांकडून शासकीय योजनेचा प्रचार प्रसारासह ज्याच्यासाठी योजना सुरू केली त्या वर्गात त्या पक्षाप्रती येत्या निवडणुकीत फरक पडला का. या बाबद मेळावे घेणे सुरू असून काहींनी कार्यकर्त्यांसह सामाजिक कार्यकर्ते व गावकऱ्यांच्या भेटी घेऊन समस्या ऐकून त्या निवारणार्थ शासन प्रशासनाशी पत्र व्यवहार सुरू केला आहे. तर काहींनी धार्मिकतेचा आधार घेतला आहे. त्यात भजन स्पर्धा, सुंदर गणपती स्पर्धा या शिवाय तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या श्रीलंकेतील येणाऱ्या पवित्र अस्थिधातू दर्शनार्थ अस्थीकलश महायात्रेचे आपल्या संस्थेत आयोजन केले होते.
हे विपश्यना साधक उच्च शिक्षित असून परदेशात शिक्षण घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. परदेशात शिक्षण घेत असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचार आणि प्रसार केल्याचे बोलले जाते. या कार्याची पावती घेऊन त्यांनी आता पर्यंत कुठलीही निवडणूक लढविली नसतांना थेट विधानसभेकरिता त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र साकोली विधानसभा क्षेत्रात दिसत आहे. विपश्यना साधक हे ज्या पक्षाकडून तिकीट इच्छुक आहेत. त्या पक्षाला बौद्ध समाज पसंती देत नसला तरी त्यांनी सोमवारी अस्थीकलश महायात्रेच्या माध्यमातून बौद्ध समाजात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येथे. सध्या आरएसएस इचारसरणीच्या लोकांनी अंगावर चीवर परिधान करून भंते बनून बौद्ध समाजातील जनतेला चुकीचे मार्गदर्शन करून लुबाडणूकीसह मानसिक गुलाम बनविण्याचा प्रयत्न होत असल्याचे अनेक उदाहरणावरून दिसून येत असल्यामुळे ह्या अस्थीकलश महायात्रेबाबद संभ्रम निर्माण होत आहे. आरएसएस विचारसरणीच्या व्यक्तीला तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या श्रीलंकेतून येणाऱ्या पवित्र अस्थिधातू दर्शनार्थ अस्थीकलश महायात्रा आपल्या संस्थेच्या आवारात आयोजन केल्याने आंबेडकरी जनतेत संभ्रम निर्माण झाला असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हस्तक तथागताचे प्रेमात पडले म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


0 टिप्पण्या