Ticker

6/recent/ticker-posts

बुद्धिबल स्पर्धात १३२ स्पर्धकाचा सहभाग


सचिन चौरसिया जिल्हा प्रतिनिधी नागपूर
चित्रा न्यूज 


रामटेक: स्व.घनश्यामराव किंमतकर सभागृह येथे खुली रॅपीड बुद्धीबळ स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यात नागपूर, भंडारा, रामटेक तहसील मधिल विविध शाळेतील १३२ स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धकांना ३२ हजारांचे रोख पुरस्कार वं स्मृति पदक देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन सृष्टी सौंदर्य बहुउद्देशीय संस्था रामटेक व तालुका पालक संघाद्वारे करण्यात आले होते.
यावेळी प्रामुख्याने पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, सृष्टि सौदर्य संस्थाचे ऋषीकेश किंमतकर, अँड. महेंद्र येरपुडे, अँड. प्रमोद बांते, नंदेश शेळके, रवी नारनवरे, प्रशांत हुमने, रवी मथुरे, डॉ. आश्विन बरबटे, डॉ गजेंद्र बरबटे, दुशांत कारामोरे, तुषार चव्हाण, प्रा ज्योतीताई बड़वाईक, डॉ. बापू सेलोकर, राजेंद्र कामळे, राज चव्हान , राजेश बाकडे, डॉ. बापू शेलोकर, पानतावने, परमार सहित आदि उपस्थित होते. 
प्रमुख उपस्तित मार्गदर्शन पर म्हणाले की बुद्धीबळ खेळामुळे विद्यार्थि यांचा बौधिक विकास होते. रामटेकच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. यानिमित्ताने रामटेक परिसरातील बुद्धिबळपटू ना बाहेरील स्पर्धकांशी खेळण्याची संधी प्राप्त झाली. ज्यांना या खेळावर नितांत प्रेम आहे त्यांनी भविष्यात जर सहयोग केला तर रामटेक चे नाव या क्षेत्रात चमकायला वेळ लागणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या