Ticker

6/recent/ticker-posts

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्तमनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज,,

नांदेड  :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार १७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८.०५ वाजता *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे* यांच्या हस्ते महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या आवारात ध्वजारोहण समारंभ पार पडला.

समारंभासाठी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी हे राष्ट्रीय पोषाखात उपस्थित होते.ध्वजारोहण संपन्न झाल्यावर मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व मराठवाड़ा गीत गायले तसेच पोलीस दलाने व अग्निशमन दलाने झेंड्यास सलामी दिली.

याप्रसंगी मनपाचे माजी पदाधिकारी व माजी सन्माननीय सदस्य, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त कारभारी दिवेकर, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, मुख्य लेखापरीक्षक तु.ल.भिसे, सहाय्यक संचालक नगररचनाकार आलुरकर, नगररचनाकार पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. जनार्दन पक्वान्ने, लेखाधिकारी श्री चन्नावार, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, कार्यकारी अभियंता शिवाजी बाबरे, शिक्षणाधिकारी राजेश पाताळे, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.सुरेशसिंह बिसेन, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रईसोद्दीन, सहाय्यक आयुक्त संजय जाधव, मो.गुलाम सादेक, स्टेडियम व्यवस्थापक रमेश चौरे, उद्यान अधिक्षक डॉ.मिर्झा फरहतुल्ला बेग, क्षेत्रिय अधिकारी रावण सोनसळे, संभाजी काष्टेवाड व अग्निशमन अधिकारी के.जी.दासरे, जनसंपर्क विभागाचे सुमेध बनसोडे, ग्रंथपाल श्रीनिवास इज्जपवार तसेच महापालिकेतील ईतर अधिकारी व कर्मचारी वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती,,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या