विठ्ठल पाटील लातूर
लातूर :-दि.7 रोजी सर्वञ श्री चे आगमन झाले व दि.15 रोजी हंडरगुळीत विसर्जण होणार आहे.माञ तत्पुर्वी संबंधित प्रशासनातर्फे डी.जे.दोन साऊंड व दोन बेसच्या वर आवाज सोडल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.असा ईषारा शांतता समिती बैठकीतुन दिला आहे.तरीही कांही मंडळाचे पदाधिकारी व डी.जे. (Dj) मालक आवाज वाढविण्यावर व लेझर लाईट्स लावण्यावर हट्टून व तंडून बसले होते.हे विशेष ! कारण आजवर फक्त इषारा देतात.कारवाई कुणीच करीत नाही.व करण्याची धमकही नाही. असे उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील गणेश मंडळाचे कांही पदाधिका-यांनी नाव ओपन करु नये.या अटीवर आमच्याशी बोलताना सांगितले.तसेच यंदाच्या उत्सवा मध्ये डी.जे. (DJ ) वाजविणार आणी श्री चा उत्सव गाजविणारच.! असे दोन मंडळाच्या कांहीजणांनी सांगितले.
कारण आजवर शांतता समितीच्या बैठकीत दिलेल्या ईषा-याचे कुणीही पालन केले नाही.यामुळेच येथील डी.जे.मालकासह सर्वच मंडळाच्या पदाधिका-यांमध्ये प्रशासनाबद्दल भीतीच राहिली नाही.म्हणुनच लेजर लाईट्सचा लखलखाट व आवाजाचा दणदणाट दरवर्षी मोठ्या प्रमाणात होत असतो.आणी याचा येथे असलेल्या शेकडो -हदयरुग्णंसह गरोदर महिला,जेष्ठ , वयस्कर मंडळी,नवजात बालक या सर्वांना हकनाक ञास सहन करावा लागत असतो.दोन साऊंड व दोन बेस च्यावर आवाजाचा दणदणाट केल्यास व लेजर लाईट्सचा वापर केल्यास पोलीस प्रशासनाकडून संबंधितांवर योग्य ती कारवाई होऊ शकते.तसेच दंड म्हणुन पाच लाख रुपयांपर्यंत दंड वसुल केला जाऊ शकतो.तेंव्हा बघू यात प्रशासन बाजीगर ठरणार का , डी.जे.मालक व मंडळ ? तेंव्हा प्रशासनाच्या अॅक्शनकडे सर्व सामान्य जनतेचे लक्ष लागले आहे..


0 टिप्पण्या