"उडान" मिशन दस साल बाद उपक्रम ; मुलांशी केला मुक्त संवाद
रवी भोंगाने साकोली
साकोली : सहाय्यक पोलीस अधिक्षक सुशांतकुमार सिंह यांचे अमरावती येथे स्थानांतरण झाले. साकोलीत शेवटचा दिवस मुलांसोबत घालविला. गणेश वॉर्ड स्थित जिल्हा परिषद केंद्र उच्च प्राथ. शाळा क्र. १ येथे सोमवार ०९ सप्टे.ला "उडान" मिशन दस साल बाद उपक्रमा अंतर्गत मुलांशी मुक्त संवाद साधला. मुलांशी संवाद साधतांना ते म्हणाले की, सदर उपक्रमाचे सतत १३ वर्षांपासून आयोजन होत आहे .विद्यार्थ्यांना भविष्यात आयएएस, आयपीएस, युपीएससी, एमपीएससी परिक्षेची पूर्वतयारी कशी करावी याची विशेष माहिती यात दिली जाते. जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा क्र. १ या शाळेत मुख्याध्यापक डी. डी. वलथरे यांच्या मार्गदर्शनात "उडान" मिशन दस साल बाद कार्यक्रम पदवीधर शिक्षक चेतन बोरकर यांनी आयोजित केला. मंचावर सहाय्यक पोलीस अधिक्षक सुशांतकुमार सिंह, मुख्याध्यापक डी. डी. वलथरे, सहा. शिक्षक एम. व्ही. बोकडे, शिक्षिका शालिनी राऊत, चित्ररेखा इंगळे, श्रद्धा औवटी, आरती कापगते शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आशिष चेडगे हजर होते. साकोली उपविभाग अंतर्गत सहाय्यक पोलीस अधिक्षक सुशांतकुमार सिंह यांचे अमरावती येथे स्थानांतरण झाले आहे. या कार्यक्रमाचे संचालन शिक्षक टि. आय. पटले तर आभार सी. एम. बोरकर यांनी मानले.
"उड्डाण - मिशन दस साल के बाद हा विशेष उपक्रम २०१३ पासून इयत्ता ६, ७ वी च्या विद्यार्थांसाठी सातत्याने चालू आहे.या उपक्रमाचा प्रमुख उद्देश ग्रामीण भागातील गोर गरीब विद्यार्थांना भविष्यात आयएएस, आयपीएस, युपीएससी, एमपीएससी, या सारखे उच्च परीक्षांच्या माध्यमाने अधिक्षक, अधिकारी कसे होता येईल या बाबत मार्गदर्शन करून लहान वयातच अधिकारी होण्याची पूर्वतयारी करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे"
-- चेतन बोरकर - पदवीधर शिक्षक - जि.प.केंद्र. उच्च प्राथ. शाळा क्र. १ साकोली


0 टिप्पण्या