Ticker

6/recent/ticker-posts

काँग्रेसच्या प्रीती जैस्वाल यांचा वंचित मध्ये प्रवेश !

चित्रा न्युज ब्युरो
मुंबई : काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या सरचिटणीस प्रीती जैस्वाल यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वंचित बहुजन आघाडी मध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होताना दिसत आहे. लोकसभेत काँग्रसने अल्पसंख्याक मुस्लीम उमेदवार न दिल्याने मुस्लीम नेते नाराज होते.  परिणामी अनेक मुस्लीम नेत्यांनी वंचित मध्ये प्रवेश केला आहे. प्रवेश करत असताना वंचित बहुजन आघाडी सर्वसमावेशक पक्ष असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या निवडणुकीत दमदार कामगिरी करणार असे चित्र आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या