Ticker

6/recent/ticker-posts

...तर ग्रामीण भागात उद्योजक निर्माण होतील - ॲड. प्रकाश आंबेडकर

चित्रा न्युज ब्युरो
मुंबई : आपल्या देशात रोजगार निर्मितीच होऊ शकत नाही, असे सांगितले जाते. मी असे मानतो की, जे दुर्लक्षित क्षेत्र आहे ते कृषी क्षेत्र आहे. ते लघु आणि मध्यम क्षेत्र आहे. यावर प्रक्रिया केली, तर ग्रामीण भागात उद्योजक निर्माण होऊ शकतील. असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

पर्यावरणाचा मुद्दा आता महत्वाचा प्रश्न बनला आहे. Fossil fuel वापरण्याला विरोध होत आहे. पण सौर ऊर्जेच्या माध्यमातून आपण यावर तोडगा काढू शकतो. असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

ॲड. आंबेडकर पुढे म्हणाले की, मी किंगमेकरच्या संकल्पनेवर कधी विश्वास ठेवत नाही. कारण राजकारणात जनता हीच किंगमेकर असते. 40 वर्षांपासूनची राजकीय परिस्थिती पाहिली तर राजकीय पक्षांना लोकच शिकवतात. लोकांना कधी राजकीय पक्ष शिकवत नाही. 

आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात बोलताना त्यांनी म्हटले की, जरांगे यांची जी मूळ मागणी होती, त्यापासून ते आता विचलित (डायव्हर्ट) झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या ही त्यांची नवीन मागणी आता निवडणुकीचा मुख्य मुद्दा होत आहे.

नरेंद्र मोदी जगभर फिरून आले. यातून एकच नॅरेटिव्ह सेट झाला की, ते जगाचे नेते आहेत. पण ते ज्या देशात गेले, त्या देशासोबत आपले संबंध कसे आहेत ?  असा सवालही आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या