Ticker

6/recent/ticker-posts

अमळनेरची जागा काँग्रेसने राखली; चोपड्यात 'सांगली पॅटर्न'च्या हालचाली


पंकज पाटील विभागिय संपादक नाशिक विभाग 


जळगाव :-जिल्ह्यात सर्वांचे लक्ष लागून असलेल्या अमळनेर विधानसभेची जागा महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसकडे गेली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चारच जागांवर लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने चोपड्यात दिलेला उमेदवार बदलासाठी दबावतंत्राचा वापर सुरू झाला आहे. सोमवारपर्यंत बदल न झाल्यास 'सांगली पॅटर्न' राबवला जाऊ शकतो, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

       विधानसभानिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. उ सोमवार व मंगळवारी इच्छुकांकडून शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल  केले जातील. महायुतीच्या सर्वच उमेदवारांची घोषणा झाली आहे.गटाने उमेदवार बदलावा यासाठी दबावतंत्राचा प्रयत्न सुरू आहे.

        सोमवारपर्यंत उमेदवार न बदलल्यास राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, काँग्रेस व नाराजांच्या माध्यमातून अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवला जाऊ शकतो; असे झाल्यास लोकसभेतील सांगली पॅटर्नची चोपडा विधानसभा मतदार संघात पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या