Ticker

6/recent/ticker-posts

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे रिपब्लिकन पक्षाची महायुतीला प्रामाणिक साथ - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

रिपब्लिकन पक्षाच्या भिमशक्तीची भाजप शिवसेनेच्या शिवशक्तीला साथ 

 रिपब्लिकन कार्यकर्त्यांची फौज महायुतीला बहुमतांनी विजयी करेल 

चित्रा न्युज ब्युरो
मुंबई  - प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे नेतृत्व विश्र्वाविजयी  नेतृत्व आहे. महामानव डॉ बाबसाहेब आंबेडकरांची देशभरात विविध स्मारके उभारणारे आणि संविधानाला मजबूत करणारे नेतृत्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे आहे. मोदींच्या नेतृत्वाचा आदर्श घेऊन महायुती सरकार ने अडीज वर्षात चांगले  काम केले आहे.गरिबांचे दुःख जाणून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र महायुती चे नेते काम करीत आहेत.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर अतूट विश्वास असल्यामुळेच रिपब्लिकन  पक्ष  महायुतीला प्रामाणिक साथ देत आहे.रिपब्लिकन पक्षाची भीमशक्ती भाजप शिवसेना च्या शिवशक्ती सोबत आहे.त्यामुळे महायुती चा विधानसभा निवडणुकीत विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.

मुंबईत सायन सर्कल येथील हनुमान हॉटेल शेजारी सायन कोळीवाडा विधानसभा मतदार संघाचे भाजप महायुती चे उमेदवार कॅप्टन तामिळ सेलवन यांच्या प्रचार 
 कार्यालयाचे उद्घाटन ना.रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी भाजप नेते आमदार प्रसाद लाड उपस्थित होते.

महाराष्ट्रात सर्व विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते अत्यंत प्रामाणिकपणे भाजप महायुतीचा प्रचार करीत आहेत.अनेक मतदार संघात भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस चे काही कार्यकर्ते बंडखोर म्हणून निवडणूक लढत आहेत काही ठिकाणी उमेदवारांची आदलाबदल आहे.रिपब्लिकन कार्यकर्त्यांची फौज मात्र  महायुती चे सरकार पुन्हा बहुमताने  निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे .रिपब्लिकन पक्षाची प्रामाणिक साथ महायुतीला विजयी करेल असा विश्वास ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या