Ticker

6/recent/ticker-posts

तळेगाव दशासार येथील कार्यकर्त्यांनी प्रताप अडसड यांच्या विजयाच्या जल्लोष



चित्रा न्युज ब्युरो
अमरावती :- तळेगाव दशासार येथील भाजप कार्यकर्त्यांनी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून निवडूनकीचा विजयाचा जल्लोष साजरा केला प्रताप अडसड यांच्या विजयाच्या जल्लोषशात तल्लीन होऊन एकच वादा प्रताप दादा' अशा घोषणाबाजी करण्यात आली. तळेगाव दशासर. धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा एकतर्फी विजय मिळवणाऱ्या तरुण आमदाराचा विजय स्थानिक गावात मोठ्या जल्लोषात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी डीजेच्या तालावर नाचणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह   आणि ही निवडणूक विजय रॅली शिवाजी चौक, हनुमान मंदिर, तेली येथून संपूर्ण गावात फटाके फोडून आणि जल्लोषात काढण्यात आली. 'प्रताप दादा तुम आगे बढो 'च्या घोषणांनी संपूर्ण गाव दणाणून गेले. आज भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, गुलाल उधळून, मिठाई वाटून आनंद साजरा केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या