Ticker

6/recent/ticker-posts

कीटकनाशक प्राशन करून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

• मिरेगाव येथील घटना 

• साकोली पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद 

चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- शेतात बेशुद्ध पडलेल्या वृद्ध शेतकऱ्याचे उपचारासाठी सामान्य रुग्णालय भंडारा येथे नेत असताना वाटेतच मृत्यू झाल्याची घटना सोमवार(ता.४ नोव्हेंबर) रोजी घडली. मृतक शेतकऱ्याचे नाव रामचंद्र किसन मानकर(६२) रा. मिरेगाव, तालुका लाखनी असे आहे. साकोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे. 
                     मृतक रामचंद्र मानकर हे अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत. काल ते साकोली ला गेले होते. तिकडून आल्यानंतर शेतावर गेले. शेतावर गेल्यानंतर विषारी कीटकनाशक प्राशन केल्यामुळे बेशुद्धावस्थेत पडून असल्याचा संशय आहे. ही बाब आजूबाजूचे शेतात धानाचे पेंडके बांधणाऱ्या शेतकऱ्यासह मजुरांचे लक्षात आल्याने त्यांनी घटनेची सूचना कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे नेले. प्रकृती अत्यवस्थ असल्याने कर्तव्यावरील वैद्यकिय अधिकाऱ्याने प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्याला सामान्य रुग्णालये भंडारा येथे नेण्याचा सल्ला दिला. तसेच साकोली पोलिसांना माहिती दिली. बेशुद्धावस्थेतील किशन मानकर याला भंडारा येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याने त्याचे पार्थिव शरीर गावी आणण्यात आले. या बाबद साकोली पोलिसांना माहिती होताच साकोली पोलिसांनी मृत्यूच्या कारणाचा शोध घेण्याकरिता घरून उत्तरीय परीक्षणासाठी उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे नेला. वृत्त लिही पर्यंत त्याचे पार्थिव शरिव शव विच्छेदन होऊन अंत्यसंस्कारासाठी घरी आले नव्हते. त्याचे मृत्यू पश्चात पत्नी, मुलगा, सून व बराच आप्त परिवार आहे. मन मिळावू रामचंद्र मानकर च्या अकाली निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत असून साकोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या