चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- मदत सामाजिक संस्था नागपूर तर्फे गुरुदेव सेवाश्रम नागपूर येथे सामाजिक, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. अश्विनी दिलीप भिवगडे लाखनी यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल २२व्या राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता संमेलनात संमेलनाचे गिरीश पांडव, संस्थाध्यक्ष ॲड. नील लाडे, सचिव दिनेश वाघमारे, सामाजिक कार्यकर्ता अनिल मेश्राम, तलाठी भगवान नंदागवळी यांचेहस्ते अश्विनी दिलीप भिवगडे यांना २०२४ च्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नारीरत्न पुरस्काराने सन्मानित करून पुरस्कार स्वरूप सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, गुलाब पुष्प व तिरंगाप्रणित दुपट्टा देऊन त्यांना गौरवान्वित करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी भिवगडे यांनी मदत सामाजिक संस्थेचे दखल घेतल्याबद्दल आभार मानले असून विष्णुदास लोणारे, छगन गायधने, अशोक गायधने, सुधीर गिरेपुंजे, भाग्यश्री काशीकर, प्रीती लिंगायत, वृशाली खेडीकर, राजश्री गणवीर, कल्याणी भिवगडे, धनंजय खंडेरा, सूर्या गभने, प्रदीप भिवगडे, अतुल भिवगडे, सचिन सोमन यांनी सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी भिवगडे यांचे अभिनंदन केले आहे.


0 टिप्पण्या