या घटनेमुळे शेतशिवारात भीतीचे वातावरण असून, चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
पंकज पाटील नाशिक विभागिय संपादक
धुळे :- झोडगे, ता. २२ चोरीसाठी आलेल्या चोरट्यांचा पाठलाग करताना चोरट्यांनी गावठी कट्ट्यातून केलेल्या गोळीबारातून दोन तरुण जखमी झाले. या झटापाटीत चोरटे फरारी झाले. या घटनेमुळे शेतशिवारात भीतीचे वातावरण असून, चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.शनिवारी (ता. २१) रात्री दीडच्या सुमारास पाटील तलावालगतच्या गणेशनगरमधील नामदेवराव गायकवाड यांचे पुत्र राहुल यांना जाग आली. त्या वेळी त्यांच्या घरामागे संशयास्पद हालचाली दिसल्या, ते चोर असल्याची चाहूल लागताच त्यांनी तत्काळ मित्र दीपक सोनवणे यांना फोन करून माहिती दिली. राहुल गायकवाड व दीपक सोनवणे या दोघा तरुणांनी चोरट्यांचा पाठलाग केला. शेतात पाणी देण्यास गेलेले जगदीश देवरे, भाऊसाहेब देसले या तरुणांनी चोरट्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्यांनी गावडीकट्ट्यातून या तरुणांच्या दिशेने गोळीबार केला. त्यात जगदीश देवरे यांच्या छातीजवळ, तर भाऊसाहेब देसले यांच्या दंडाला स्पर्श करून गोळी गेल्याने दोन्ही तरुण जखमी झाले.गोळीबाराच्या या गोंधळात चारही चोरटे पळून जाण्यास यशस्वी झाले. दोन्ही जखमी तरुणांना उपचारासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. चोरांनी गावठी कट्टयाने गोळीबार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या झोडगे गावात रात्रंदिवस वर्दळ असते. मात्र चोरटे पसार झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.झोडगे येथील आउट पोस्टची इमारत जीर्ण झाली असून, पोलिस कर्मचाऱ्यांना राहण्याची सोय नसल्याने पोलिसांना अडचणी येतात. शासनाने झोडगेसह परिसरातील लोकसंख्येचा विचार करून पोलिसांसाठी इमारत बांधावी. महामार्गावरील अपघात व गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. संजय भामरे, पोलिस पाटील, झोडगे


0 टिप्पण्या