चित्रा न्युज ब्युरो
शेगाव : वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रातील शेगाव येथे मंगळवारी( दि.10) राष्ट्रीय अध्यक्ष आणि कार्यकारिणी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत पारलिंगी समुदायातील दिशा पिंकी शेख यांची राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये निवड करण्यात आली आहे. तसेच समजातील अनेक समुहांच्या सदस्यांना प्रतिनिधित्व देऊन वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीत सर्वसमावेशकता दाखवली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ॲड. प्रकाश आंबेडकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच ॲड. अरुण सावंत, अरुंधती सिरसाठ, अशोक सोनोने, दिशा पिंकी शेख, प्रा. किसन चव्हाण, डॉ. क्रांती सावंत, महेश भारतीय, डॉ. नितीन ढेपे, राहुल गायकवाड, सविता मुंढे, सुजाता वालदेकर, सय्यद खतीब नतोकोद्दीन यांचे राष्ट्रीय कार्यकारिणीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
-----


0 टिप्पण्या