Ticker

6/recent/ticker-posts

पान मसाला व सुगंधित तंबाखू विक्रेत्यावर गुन्हा दाखल

• अन्न औषधी प्रशासन व पालांदूर पोलिसांची संयुक्त कारवाई

• 2 आरोपींना अटक, 84 हजार 700 रुपयाचा मुद्देमाल जप्त 

चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- महाराष्ट्र शासनाने मानवी आरोग्यास हानिकारक प्रतिबंधित केलेली सुगंधित तंबाखूजन्य पदार्थाची पळसगाव/कोलारी येथे विक्री करीत असताना रंगेहाथ पकडल्याने पालांदूर पोलिसांनी गुरुवार(ता.19 डिसेंबर) रोजी मध्यरात्री दरम्यान 2 इसमावर भारतीय न्याय संहिता, अन्न सुरक्षा व मानदे कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांचेकडून 84 हजार 788 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींची नावे हेमंत रमेश बावनकुळे(22) रा. खूनारी, तालुका लाखनी, संदीप विलास कावळे(35) रा. अड्याळ, तालुका पवनी अशी आहेत. पोलिस उपनिरीक्षक रुपेश कुंभरे तपास करीत आहेत. 
                       पोलिस उपनिरीक्षक रुपेश कुंभरे हे पालांदूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी कोंबिंग ऑपरेशन कामी रवाना होऊन पोलिस ठाणे हद्दीत अवैधधंदे कार्यवाही कामी पेट्रोलिंग करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार नितीन महाजन यांच्या पथकाला पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहिती वरून पळसगाव येथे हेमंत बावनकुळे व संदीप कावळे 1) पांढ-या रंगाच्या 4 प्लास्टिक चुंगडीमध्ये प्रत्येकी चुंगडीमध्ये ।। पोंकिट ईगल हुक्का शिशा सुगंधीत तंबाखु चे एकुण 44 पॉकीट प्रत्येकी पॉकिट 400 ग्रॅम प्रति किं. 640 रू असा एकुण 28160/- रू. एकूण वजन -१७.६ किलो 2) पिवळ्या रंगाच्या तीन प्लास्टिक चुंगडीमध्ये प्रत्येकी चूंगडीमध्ये 10 पॉकिट होला हुक्का शिशा सुगंधीत तंबाखू १ किलो चे एकुण 30 पॉकिट प्रत्येकी किं 820 रू असा एकुण 24600/- रु एकूण वजन - 30 किलो 3) एका खरड्याचे बॉक्स मध्ये मजा 108 हुक्का शिशा सुगंधित तंबाखु चे 6 बॉक्स ज्यामध्ये प्रत्येकी 10 डब्बे एकूण 60 डब्बे प्रत्येकी बॉक्स किं. 2350 रु, प्रत्येकी वजन -50 ग्राम असा एकूण 14100 रू. एकूण वजन 3.00 किलो. 4) एका खरड्याचे बॉक्स मध्ये रत्ना छाप सुगंधित तंबाखु चे 14 बॉक्स ज्यामध्ये प्रत्येकी 10 डब्बे एकुण 140 डब्बे प्रत्येकी बॉक्स कि. 1180 रु, प्रत्येकी वजन ५० ग्राम, असा एकूण 16520/- रु. एकूण वजन 7.00 किलो 5) एक पांढ-या रंगाचे पान पराग पान मसाला लिहिलेल्या चुंगडीमध्ये ।। पॉकिट पान पराग प्रिमियम पान मसाला प्रत्येकी पॉकिट कि. 128 रु, प्रत्येकी वजन 96 ग्राम असा एकूण 1408/- रू. एकूण वजन 1.056 किलो चा मुद्देमाल, असा एकुण घरी मिळून आलेला प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखू व पान मसाला किंमत 84 हजार 788/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने कारवाई करून पोलिस उपनिरीक्षक रुपेश कुंभरे यांचे पत्र क्रमांक 1956/2024 दिनांक 19/12/2024 नुसार अन्न व औषध प्रशासन भंडारा चे अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे हे पोलिस ठाणे पालांदूर ला येऊन हेमंत व संदीप यांचे ताब्यातील माल सुरक्षेच्या दृष्टीने ठेवलेल्या साठ्याची तपासणी केली असता सदर मुद्देमाल महाराष्ट्र शासनाने मानवी आरोग्यास हानिकारक व प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा मुद्देमाल मिळून आल्याने अण्णा सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे व पोलिस उपनिरीक्षक रुपेश कुंभरे यांचे फिर्यादी वरून पालांदूर पोलिसांनी हेमंत बावनकुळे व संदीप कावळे यांचे विरुद्ध अपराध क्रमांक 219/2024 कलम 123, 223, 274, 275, 3(5) तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायद्याचे कलम 3(1)(झेडझेड)(|||), 3(1)(झेडझेड)(व्ही) कलम 26(1), 26(2)(|V), 27(3)(ई), 30(2)(ए), 59 अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिस उपनिरीक्षक रुपेश कुंभरे तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या