चित्रा न्युज ब्युरो
धुळे : धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज धुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ अमित शहा यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी अमित शहाच्या प्रतिमेला महिला तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जोडे मारून आपला निषेध व्यक्त केला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे धुळे शहर उमेदवार जितु शिरसाट, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रविकांत वाघ, जिल्हा संघटक शंकर खरात, युवा जिल्हाध्यक्ष योगेश पगारे, एस. यु तायडे, सुरेश लोंढे, महेंद्र महाले, प्रभाकर खंडारे ,युवा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे, आकाश येलेकर, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष आकाश बागुल, चंद्रमणी वाघ, संजय अहिरे, विशाल महाले, मयूर गरुड, आकाश बाविस्कर, आकाश कदम, मुन्ना सरकार, सिरातल खाटीक, कल्पना सामुद्रे, वंदना बागुल, मोनू सोनार, राज आगळे, रावण बागुल, यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या