Ticker

6/recent/ticker-posts

दिघोरी येथे शौर्य दिन उत्साहात साजरा

चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :-लाखनी तालुक्यातील दिघोरी/नान्होरी च्या धम्मचक्र महाबोधी बुद्ध विहार स्मारक समितीचे वतीने बुधवार(ता.१ जानेवारी) रोजी भीमाकोरेगाव शौर्य दिन उत्साहात साजरा करून शुरवीरांना मानवंदना देण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सरपंच शरद इटवले, प्रमुख अतिथी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. मेघश्याम हलमारे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. युवराज मोटघरे, माजी उपसरपंच अनिरुद्ध मेश्राम, पोलिस पाटील अजय खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ता भीमराव देशपांडे, ग्रामपंचायत सदस्य आशिष खोब्रागडे, शेषराव बनसोड, विविध कार्यकारी संस्थेचे संचालक हरगोविंद खोब्रागडे यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याना माल्यार्पण, मेनबत्ती व अगरबत्ती प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे महत्त्व विषद करून २०७ वर्षापूर्वी शूरवीर ५०० महारांनी पेशव्यांच्या २८ हजार सैन्याचा पराभव केला. या बाबद सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ता प्रेमकुमार खोब्रागडे, सूत्रसंचालन धम्मचक्र महाबोधी बुद्ध विहार स्मारक समितीचे सचिव नंदकुमार गणवीर तर आभार समितीचे अध्यक्ष संदीप खोब्रागडे यांनी मानले. उपासक सुनील घरडे व उपासिका मंदा देशपांडे यांचेसह बहुसंख्येने बौद्ध उपासक, उपासिका शौर्य दिन कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या