Ticker

6/recent/ticker-posts

इंडियन पोलिस मित्र संघटनेची 28 फेब्रुवारी गडचिरोलीत बैठक


🔹 जिल्हा पोलिस उप अधिक्षक सदानंद सदाशिव यांचे मार्गदर्शन.  

चित्रा न्युज प्रतिनिधी
गडचिरोली:-  गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यातील इंडियन पोलिस मित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची , सभाससदांची  बैठक  दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी गडचिरोली येथील , इंदिरा गांधी चौकातील रेस्ट हाऊस येथे दुपारी ३  वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.  या बैठकीला इंडियन पोलीस मित्र चे मुख्य अधिकारी डॉ. सुरेश राठोड , जिल्हा  पोलीस उपअधीक्षक सदानंद सदाशिव यांचे  विविध विषयांवर मार्गदर्शन लाभणार आहे.   या बैठकित संघटनेच्या कार्याची रुपरेषा ,  कार्यप्रणाली,  सदस्य नोंदणी,  जबाबदारी आणि सामाजिक दायित्व,  या सारख्या अनेकविध विषयांवर जिल्हा पोलीस उपअधीक्षक सदानंद सदाशिव , डॉ.सुरेश राठोड यांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभणार आहे तरी सर्वांनी या बैठकिला  उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हाध्यक्ष हंसराज उराडे, कार्याध्यक्ष चक्रधर मेश्राम यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी ९६२३४५९६३२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या